शिवसेना उबाठाचे आमदार महेश सावंत लिलावती रुग्णालयात!

डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला

शिवसेना उबाठाचे आमदार महेश सावंत लिलावती रुग्णालयात!

माहीम मतदार संघातून नवनिर्वाचित निवडून आलेले शिवसेना उबाठाचे आमदार महेश सावंत यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. सध्या ते मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल आहेत.

आमदार महेश सावंत यांना काल (२८ नोव्हेंबर) सकाळी अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना त्वरित माहीमच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली. यावेळी त्यांच्या हृदयातील रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक असल्याचे दिसून आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना लिलावती रुग्णालयात हलवण्यात आले. या ठिकाणी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, राज्यात नुकत्याच विधानसभा पार पडल्या असून लवकरच महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत अनेक मतदारसंघात चुरशीची लढत झाली, अनेक बड्या नेत्यांना पराभवाचा सामनाही करावा लागला. अशीच लढत माहीम मतदारसंघात देखील पाहायला मिळाली होती. एकीकडे शिंदेंचे सरवणकर, मनसेचे अमित ठाकरे आणि उबाठाचे महेश सावंत अशी तिहेरी लढत बघायला मिळाली. मात्र, या तिहेरी लढतीत महेश सावंत यांनी बाजी मारत विजय प्राप्त केला.

हे ही वाचा : 

संभल मशीद प्रकरण: कनिष्ठ न्यायालयाने ८ जानेवारीपूर्वी कोणतीही कारवाई करू नये!

भांडुपच्या शाळेत विद्यार्थीनिंचा विनयभंग, लिफ्ट मॅकेनिकला अटक!

हिंदू असल्याचे भासवत कासीमने केले लग्न, आता धर्मपरिवर्तनासाठी दबाव!

पोर्नोग्राफी प्रकरणाशी संबंधित राज कुंद्राच्या घरासह कार्यालयावर छापे

 

पावशेर, शेर आणि शेरनी ! Mahesh Vichare | Sanjay Raut | Priyanka Gandhi Vadra

 

Exit mobile version