ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या शुभमुहूर्तावर होणारा छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक यशस्वीरीत्या संपन्न होण्यासाठी राबणाऱ्या सर्व मावळ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीच्या वतीने अथक परिश्रम करणाऱ्या सर्व मावळ्यांचा ‘मानपत्र’ देऊन सत्कार करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे दुर्गतपस्वी, ज्येष्ठ इतिहास संकलक अप्पा परब यांना ‘शिवसन्मान’ पुरस्काराने समितीच्या वतीने सन्मानित करण्यात येणार आहे. तरी समितीच्या सर्व मावळ्यांना सहकुटुंब या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे समितीकडून आवाहन करण्यात आले आहे.
हा सोहळा रविवार (२८ जुलै) रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृह (दादर ) या ठिकाणी होणार आहे. सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी समितीकडून सर्व मावळ्यांना निमंत्रण पाठवून उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे इतिहासातील विविध विषयांवर सुमारे ३५ च्या वर पुस्तके लिहिणारे आणि ज्येष्ठ इतिहास संकलन अप्पा परब यांना ‘शिवसन्मान’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
वेळ पडल्यास अनिल देशमुखांचे ऑडीओ व्हिजुअल्स जाहीर करणार
सीएपीएफ, आसाम रायफल्समध्ये आता अग्निवीरांना संधी, १० टक्के जागा आरक्षित
सचिव अजिंक्य नाईक झाले एमसीएचे अध्यक्ष !
ऑलिम्पिक स्पर्धेच्या तोंडावर ऑस्ट्रेलियन महिलेवर पॅरिसमध्ये बलात्कार
या सोहळ्याला सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार सदा सरवणकर, आमदार भरत गोगावले, माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक कार्याध्यक्ष रणजित सावरकर, श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती अध्यक्ष सुनील पवार आदी मंडळी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे समितीकडून आवाहन करण्यात आले आहे.