31 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेष‘देव्हाऱ्यात पूजेसाठी असलेला धनुष्यबाण एकनाथ शिंदेंनीच दिला होता...’

‘देव्हाऱ्यात पूजेसाठी असलेला धनुष्यबाण एकनाथ शिंदेंनीच दिला होता…’

शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा दावा

Google News Follow

Related

उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून देव्हाऱ्यात पुजला जात असलेला धनुष्यबाण दाखवत भावनिक आवाहन केले होते. मात्र तो धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांनीच दिला होता, असा दावा शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केला आहे.

म्हात्रे यांच्या या दाव्यामुळे सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शीतल म्हात्रे यांनी दावा केला आहे की, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देवघरात ठेवलेला धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांनीच दिलेला होता…हे तरी लक्षात आहे का?

हे ही वाचा:

एकनाथ शिंदे शिवसेनेचे प्रमुख

गुढीपाडवा, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीलाही मिळणार आनंदाचा शिधा

नाहीतर रस्त्यावर पवार… पवार ओरडत,  दगड भिरकावत फिरायची पाळी येईल

“शिंदे गट’ नाही आता “शिवसेना” म्हणा..

निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर शरसंधान केले होते. निवडणूक आयोग हा गुलाम बनला आहे, अशी टीका त्यांन केली होती. शिवाय, धनुष्यबाण हे चिन्ह गेले असले तरी खरा धनुष्यबाण आमच्याकडेच आहे असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून पूजले जात असलेला छोटा धनुष्यबाण पत्रकारांना दाखविला. बाळासाहेब ठाकरे या धनुष्यबाणाचे पूजन नेहमी करत असत असे ते म्हणाले होते. त्यावर आता शीतल म्हात्रे यांनी प्रतिक्रिया देत सोशल मीडियात खळबळ उडविली आहे.

सध्या महाराष्ट्रात शिवसेना कुणाची यावरून अजूनही चर्चा सुरू आहे. निवडणूक आयोगाने शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला असला तरी तो उद्धव ठाकरे यांना मान्य नाही. त्यांनी शिंदेंकडून देण्यात आलेल्या व्हीप आपण मान्य करणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा