भाजपाचे शिर्डीत प्रदेश अधिवेशन, मुख्यमंत्र्यांचा केला जाणार भव्य सत्कार!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जे.पी.नड्डा राहणार उपस्थित

भाजपाचे शिर्डीत प्रदेश अधिवेशन, मुख्यमंत्र्यांचा केला जाणार भव्य सत्कार!

स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र भाजप एक मोठा उपक्रम हाती घेत आहे. १२ जानेवारी २०२५ रोजी शिर्डीत भाजपचं प्रदेश अधिवेशन होणार आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली.

या ऐतिहासिक कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री आदरणीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा राहणार उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा भव्य सत्कार केला जाणार आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मोठे यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर या अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार केले जाणार आहे.

हे ही वाचा : 

चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू प्रकरणी ‘पुष्पा’ फेम अभिनेता अल्लू अर्जुनला अटक

‘जॉय बांगला’ यापुढे बांगलादेशचा राष्ट्रीय नारा नाही!

उद्धव ठाकरेंना बांगलादेशातील हिंदुंबद्दल कणव, मोदींनी लक्ष घालावे अशी मागणी

प्रार्थनास्थळांना आव्हान देणारे नवे खटले दाखल होणार नाहीत!

स्वामी विवेकानंदांच्या विचारांवर आधारीत या अधिवेशनातून युवकांना प्रेरित करून भाजपकडे आकर्षित करण्यासाठी नव्या अभियानाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनासाठी महाराष्ट्रभरातून १० हजार भाजप पदाधिकारी आणि तरुण कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम भाजपच्या आगामी योजनांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे, ज्यामध्ये तरुणाईशी संपर्क वाढविण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येईल, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. 

Exit mobile version