शिर्डी विमानतळावर आता नाईट लँडिंग सुविधा

डीजीसीएची मंजुरी

शिर्डी विमानतळावर आता नाईट लँडिंग सुविधा

मोदी सरकारने शिर्डीकरांसाठी नागपूर ते शिर्डी हा समृद्धी महामार्ग, त्यापाठोपाठ मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस अशा दोन भेटी दिलया होत्या .. आता केंद्र सरकारने आणखी एक मोठी भेट दिली आहे. आता साईबाबांचे दर्श घेण्यासाठी जाणाऱ्या कोट्यवधी भक्तांसाठी शिर्डी विमानतळावर रात्रीही विमानाचे लँडिंग करता येणार आहे. डीजीसीएने त्यास मान्यता दिली आहे.

गेल्या दोन महिन्यांत शिर्डीला तिसरी भेट मिळाली आहे. आता शिर्डी विमानतळावर रात्रीही उतरणे शक्य होणार आहे. साईभक्तांना आता रात्री विमानाने उतरून साईबाबांच्या काकड आरतीला उपस्थित राहता येऊ शकणार आहे. भाविकांची प्रचंड गर्दी आणि लोकांच्या श्रद्धेमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी आणि विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे ही मागणी केली होती. या मागणीला आता डीजीसीएने मंजुरी दिली आहे.

शिर्डी विमानतळाचे कामही २०१७ मध्ये फडणवीस सरकारच्या काळात सुरू झाले होते. डीजीसीएची मंजुरी मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी आणि सिंधिया यांचे आभार मानले आहेत.शिर्डीला मिळालेल्या या नव्या भेटीमुळे यात्रेकरूंचा शिर्डीचा प्रवास सुकर होणार आहे. यासोबतच या परिसराच्या विकासालाही गती मिळणार आहे.

हे ही वाचा:

महाशिवरात्रीसाठी बेस्ट तर्फे विशेष बस सेवा

शिवजयंतीला घ्या शिवसृष्टीतील सरकारवाड्याचा अनुभव

सुकमामध्ये ३३ नक्षलवाद्यांनी खाली ठेवल्या बंदुका

इतकी कोटी झाली देशातील डिमॅट खातेदारांची संख्या

या नवीन सुविधेमुळे भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होण्याचीही अपेक्षा आहे. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून, उन्हाळी उड्डाण वेळापत्रक लागू केले जाईल. मार्च, एप्रिलपासून रात्रीच्या विमान उड्डाणाला सुरुवात होईल अशी अधिकाऱ्यांना खात्री आहे. सध्या शिर्डीला १३ विमानसेवा सुरू आहेत.कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा गेल्यावर्षी ३ नोव्हेंबरला सुरु झाली.

 

Exit mobile version