दक्षिण चीनमधील ग्वांगझू शहरातील एका पुलावर रिकामे मालवाहू जहाज आदळल्याने दोन जण ठार झाले आणि तीन जण बेपत्ता झाले आहेत.या मालवाहू जहाजाच्या धडकेमुळे लिक्सिनशा पुलाचा एक भाग कोसळला.पुलाचा भाग कोसळल्याने पुलावरून प्रवास करणाऱ्या बससह पाच वाहने खाली पाण्यात पडली, अशी चीनच्या वाहिन्यांनी बातमी दिली.
चीनच्या स्थानिक माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार, हे मालवाहू जहाज फोशान येथून येत होते आणि ग्वांगझूच्या दिशेने जात होते. त्याच दरम्यान ग्वांगझू शहरातील लिक्सिनशा ब्रिजला हे मालवाहू जहाज धडकले.हे मालवाहू जहाज रिकाम्या स्वरूपात होते.सकाळी साडेपाच वाजता (स्थानिक वेळेनुसार) ही घटना घडली.
हे ही वाचा:
भारत-चीन सीमाभागात बर्फात अडकलेल्या ५०० जणांची सुटका
शेतकऱ्यांचे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित; किमान आधारभूत किमतीची मागणी चुकीची
जयपुरिया लखनऊ बनले उद्यमतेचे केंद्र
लोकसभा निवडणुकीत अमीट शाईच्या साडेसव्वीस लाख बाटल्यांचा वापर
जेव्हा मालवाहू जहाज पुलावर आदळले तेव्हा पुलाचा काही भाग कोसळला, त्यावेळी पुलावर एक बस होती, असे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले.या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन लोक अद्याप बेपत्ता आहेत.तसेच या दुर्घटनेत एक क्रू सदस्य जखमी झाला आहे.जहाजाच्या कॅप्टनला ताब्यात घेण्यात आले आहे, असे बीजिंग न्यूजने म्हटले.
दरम्यान, लिक्सिंशा पुलाचे अपग्रेडेशन आणि नूतनीकरण केले जाणार होते, मात्र ते पुढे ढकलण्यात आले. ऑक्टोबर २०२१ या पुलाच्या मजबुती करण्यासाठी आणि जहाजाच्या धडकेपासून वाचण्यासाठी उपाययोजना कराव्या लागणार असल्याचे तेथील प्रांतीय अधिकाऱ्यांनी सांगितले होते.मात्र, ऑगस्ट २०२४ पर्यंत याची मुदत वाढवण्यात आली.