वरळी हिट अँड रन प्रकरणी शिंदे गटाची मोठी कारवाई, राजेश शाहांची पक्षातून हकालपट्टी!

पक्षाकडून परिपत्र जारी

वरळी हिट अँड रन प्रकरणी शिंदे गटाची मोठी कारवाई, राजेश शाहांची पक्षातून हकालपट्टी!

वरळी हिट अँड रन प्रकरणी मुख्य आरोपीच्या वडिलांवर शिवसेना शिंदे गटाने मोठी कारवाई केली आहे. शिवसेना शिंदे गटाने राजेश शाह यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. याबाबत शिंदे गटाकडून परिपत्र काढण्यात आले आहे.

मुंबईतील वरळी हिट अँड प्रकरणाने राज्याचे राजकीय वातावरण तापले आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहला पोलिसांनी शहापूरमधून अटक केली. मात्र, या प्रकरणात अधिक चर्चा झाली ती म्हणजे आरोपी मिहीर शाहचे वडील राजेश शाह यांची कारण की राजेश शाह हे शिवसेना शिंदे गटातील नेते आहेत. राजेश शाह हे पालघर जिल्ह्यात उपनेता पदावर कार्यरत आहेत. यामुळे राजकीय नेत्यांमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरु झाले. यावरून विरोधी पक्षांनी शिंदे गटाला लक्ष केले.

हे ही वाचा:

वरळी हिट अँड रन प्रकरणी बारवर हातोडा!

दारू पिऊन वाहन चालवल्यास लायसन्स होणार रद्द

उत्तर प्रदेशात बसची दुधाच्या टँकरला धडक; अपघातात १८ जणांचा मृत्यू

मराठवाड्यासह विदर्भाला ४.२ रिश्टर स्केल भूकंपाचा बसला धक्का

यानंतर शिंदे गटाने राजेश शाह यांच्यावर कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. याबाबत शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून परिपत्र काढण्यात आले असून त्यावर शिवसेना सचिव संजय मोरे यांची सही आहे. शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार राजेश शाह, पालघर यांना शिवसेना उपनेना पदावरून कार्यमुक्त करण्यात येत आहे, असे परिपत्रकात लिहिले आहे.

Exit mobile version