राज्य सरकारच्या १०० रुपयांच्या दिवाळी भेटीत काय आहे?

राज्य सरकारच्या १०० रुपयांच्या दिवाळी भेटीत काय आहे?

दिवाळी तोंडावर आलेली असतानाच राज्यातील रेशनकार्डधारकांना राज्य सरकारने दिवाळी भेट दिली  आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यंदाच्या दिवाळीसाठी रेशनकार्डधारकांना शिधा वस्तूंचे पॅकेज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना रवा, चणाडाळ, साखर आणि तेल यांचे प्रत्येकी एक-एक किलोचे पॅकेज अवघ्या शंभर रुपयात देण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील ७ कोटी नागरिकांचे दिवाळी आधीच तोंड गोड झाले आहे.

पॅकेजमधील शिधावस्तूंचे दिवाळीच्या अगोदर वाटप व्हावे तसेच केणत्याही तक्रारी येऊ नये याची खबरदारी घ्यावी अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाला दिल्या अहेत. हा संच एक महिन्याच्या कालावधीसाठी देण्यात येणार अहे. या संचाचे वितरण इ-पॅस प्रणाली मार्फत करण्यात येणार अहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती मुख्यमंत्री शिंदे अणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

१०० रुपयांत मिळणार हा शिधा : एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो तेल

हे ही वाचा:

अफगाणिस्तानात शैक्षणिक संस्थेत स्फोट; ४६ मुलींसह ५३ ठार

पोलीस महासंचालकांच्या हत्येची पीएएफएफ दहशतवादी संघटनेने घेतली जबाबदारी

जम्मू काश्मीरमध्ये पोलीस महासंचालकांची गळा चिरून हत्या

मुंबई विमानतळावरून ९.८ कोटींचे कोकेन जप्त

माविआ सरकार फाईलवर बसलेले सरकार

मागच्या तीन महिन्यांत ५७ धोरणात्मक निर्णय घेण्यात आले पण हे सगळे निर्णय भाजपच्या मंत्र्यांचे आहेत. त्यामुळे या निर्णयावर फडणवीसांचा हाेल्ड दिसून येत आहे. असा प्रश्न विचारला असता उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शिवसेना अथवा भाजप पक्ष निर्णय घेत हे महत्वाचं नाही. शासन निर्णय घेतं. कोणताही एखादा निर्णय कॅबिनेटकडे निर्णयासाठी येतो ते मुख्यमंत्री ठेवतात अणि त्याला कॅबिनेट मान्यता देतं असतं. त्यांना निर्णय घेण्याची सवय नव्हती. हे निर्णय घेणारे सरकार आहे असा टोला फडणवीस यांनी लगावला. माविआ सरकार फाईलवर बसलेले सरकार होते. त्यामुळे त्यांना त्याचे दु:ख होणे सहाजिकच अहे. त्यामुळे विरोधकांची अधूनमधून मळमळ बाहेर येते, अशी टीकाही उपमुख्यमंत्र्यांनी या वेळी केली.

Exit mobile version