भारतीय संघाचा डावखुरा सलामीवीर शिखर धवन याने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. शिखर धवन याने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. धवनने ‘एक्स’वर व्हिडीओ शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे. त्याने निर्वृत्ती जाहीर करताना सर्वांचे आभार मानले आहेत.
शिखर धवनने आंतराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे. त्याने १ मिनिट १७ सेकंदांचा व्हिडीओ पोस्ट करत सर्वांचे आभार मानले आहेत. क्रिकेट शिकवणारे त्याचे गुरु, सहकारी, बीसीसीआय, आयसीसी अशा सर्वांचे आभार मानत धवनने क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे.
निवृत्तीची घोषणा करताना शिखर धवन म्हणाला की, “सगळ्यांना नमस्कार, आज मी अशा ठिकाणी उभा आहे, जिथून वळून मागे पाहिल्यानंतर फक्त आठवणी दिसतात आणि पुढे पाहिल्यावर संपूर्ण जग… माझं आधापासून एकच स्वप्न होतं की भारतासाठी खेळायचं आणि ते माझं स्वप्न पूर्णही झालं. यासाठी मी अनेक लोकांचा आभारी आहे. माझं कुटुंब, माझे बालपणीचे मित्र, ज्यांच्यासोबत मी क्रिकेट खेळलो. माझे कोच सिन्हा आणि शर्मा ज्यांच्याकडून मी क्रिकेट शिकलो… माझी क्रिकेटची टीम ज्यांच्यासोबत मी कितीतरी वर्षे खेळलो. त्यांच्या रूपात मला आणखी एक कुटुंब मिळालं. नाव मिळालं. आपल्या सगळ्यांचं प्रेम मिळालं,” असं शिखर म्हणाला आहे.
हे ही वाचा:
नेपाळ बस अपघातात महाराष्ट्रातील २४ पर्यटकांचा मृत्यू; वायुसेनेच्या विमानाने मृतदेह राज्यात आणणार
मुंबईत बदलापूरच्या घटनेची पुनरावृत्ती?, एकानेच केला दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
महाराष्ट्र बंद मागे; पवारांच्या ट्विटने ठाकरेंची हवाच काढली !
शरद पवार म्हणाले, महाराष्ट्र बंद मागे घ्या!
शिखर धवन हा भारतीय क्रिकेट संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून ओळखला जायचा. डावखुरा सलामीवीर फलंदाज म्हणून त्याची विशेष ओळख होती. त्याच्या आक्रमक खेळीसाठी म्हणून तो ओळखला जायचा. भारतीय संघात तो फलंदाजीसाठी सलामीला यायचा. त्याने आतापर्यंत ३४ कसोटी, १६७ एकदिवसीय तसेच ६८ सामने खेळलेले आहेत. देशांतर्ग क्रिकेटमध्ये कित्येक वर्षे खेळल्यानंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळाले. त्याने भारतीय संघाकडून २०१० साली पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाविरोधात फलंदाजी केली होती. शिखर धवनने इंडियन प्रिमियर लीगमध्येही उत्तम कामगिरी केलेली आहे. तो पंजाब किंग्ज या संघाचा कर्णधार राहिलेला आहे.