श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर

शिखर धवन करणार नेतृत्व

श्रीलंका बरोबरच्या आगामी एक दिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा डावखुरा सलामीवीर शिखर धवन याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. तर संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्र राहुल द्रविड सांभाळणार आहे.

जुलैमध्ये एकीकडे जेव्हा मुख्य भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडमध्ये असणार आहे. तेव्हाच भारतीय संघाचा श्रीलंका दौराही पार पडणार आहे. या श्रीलंका दौऱ्यासाठी गुरुवार, १० जून रोजी भारतीय संघ जाहीर झाला असून या संघाचे नेतृत्व सलामीवीर शिखर धवन करणार आहे. तर वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा या संघाचा उपकप्तान असणार आहे. या संघात अनेक नवोदीत युवा खेळाडूंना संधी देण्यात आली असून त्यांना अनुभवी खेळाडू आणि राहुल द्रविड सारख्या प्रशिक्षकाच्या सहवासात बऱ्याच गोष्टी शिकता येणार आहेत.

श्रीलंका विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ हा पुढील प्रमाणे असेल. शिखर धवन, पृथ्वी शॉ, देवदत्त पडीकल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, नितीश राणा, ईशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, राहुल चहर, के गौतम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरूण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन साकरिया यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

तरी यांच्या सोबत नेटमध्ये बॉलिंग करण्यासाठी निशान पोरेल, संदीप वारियर, अर्शदीप सिंह, साई किशोर, सिमार्जीत सिंह यांची निवड करण्यात आली आहे.

Exit mobile version