संदेशखाली मधून मोठी बातमी समोर आली आहे.जमीन बळकावण्याचा आणि लैंगिक छळाचा आरोप असणारा तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेख अद्याप फरार आहे.मात्र, संदेशखाली येथील शेख सिराजुद्दीन याची संपत्ती ग्रामस्थांकडून जाळण्यात आली आहे. शेख सिराजुद्दीन हा फरार आरोपी शाहजहान शेख याचा लहान भाऊ आहे.गुरुवारी (२२ फेब्रुवारी) रोजी ही घटना घडली.त्यानंतर गावात तणाव निर्माण झाला आहे.तसेच संतप्त गावकऱ्यांनी संदेशखाली येथील स्थानिक क्रीडांगणावरही ताबा मिळवला आहे, जो शाहजहान शेख आणि त्याच्या साथीदारांनी गावकऱ्यांकडून जबरदस्तीने ताब्यात घेतला होता.
संदेशखाली येथील शेख सिराजुद्दीन याच्या मालमत्तेला संतप्त गावकऱ्यांकडून आग लावण्यात आली.शेख सिराजुद्दीन यांच्या मालकीच्या असलेल्या मत्स्यपालन फार्मच्या मध्यभागी एक गोदाम आहे.या गोदामाला गावकऱ्यांनी आग लावली.तृणमूल नेते आणि त्यांच्या नातेवाईकांनी बेकादेशीर रित्या बळकावलेल्या जमिनीवर हे गोदाम बांधण्यात आले होते, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.सिराजुद्दीनने या शेतावर खारे पाणी ओतून या जमिनीची सुपीकता नष्ट केली अन त्यावर ताबा मिळवला, असा आरोप गावकऱ्यांनी केला.
हे ही वाचा:
रामलल्लाच्या दरबारात महिन्याभरात ६२ लाख भाविकांची हजेरी
शेतकरी आंदोलनात मृत्यू झालेल्या शुभकरन सिंहच्या कुटुंबियांना मिळणार एक कोटींची भरपाई!
बाळासाहेबांची चिठ्ठी अन् मनोहर जोशी मुख्यमंत्रीपदावरून पायउतार; काय लिहिलेलं चिठ्ठीत?
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन
संदेशखाली मत्स्यपालन फार्मसाठी ओळखले जाते, जे जास्त करून शाहजहान आणि त्याचे सहकारी यांच्या ताब्यात आहेत.मात्र, असे बहुतेक मत्स्यपालन फार्म आहेत जे बेकायदेशीररित्या स्थापन केले आहेत, असा आरोप स्थानिकांचा केला आहे.काही गावकऱ्यांनी असाही आरोप केला आहे की, सिराजुद्दीनच्या जवळच्या सहकाऱ्यांनी हे ठिकाण सोडण्यापूर्वी याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देखील त्यांनी दिली होती.दरम्यान, जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घर नये म्हणून पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे.