बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना दोन दिवसीय भारत दौऱ्यावर!

दोन्ही नेत्यांची महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना दोन दिवसीय भारत दौऱ्यावर!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिल्यानंतर दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीनंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना त्यांच्या दोन दिवसांच्या राज्य दौऱ्यासाठी भारतात परतल्या आहेत. भारतात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर परदेशी नेत्याची ही पहिली येणारी द्विपक्षीय राज्य भेट आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासोबत विविध विषयांवर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, दोन्ही नेते अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्य प्रदान करणाऱ्या करारांवर स्वाक्षरी करतील अशी अपेक्षा आहे. शेख हसीना यांचे शनिवारी(२२ जून) नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात आले. समारंभानंतर त्यांनी पंतप्रधान मोदींचीही भेट घेतली. शेख हसीना यांचा भारतीय दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे.

हे ही वाचा:

१२ मिराज-२००० लढाऊ विमानांच्या खरेदीबाबत भारत-कतार दरम्यान चर्चा!

अटल सेतूवर भेगा पडल्याचे वृत्त खोटे!

अमेरिकेत किराणा दुकानात झालेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू, १० जण जखमी!

इस्रायल-हमासदरम्यान भीषण युद्धाला सुरुवात!

शुक्रवारी(२१ जून) नवी दिल्लीत आल्यानंतर पंतप्रधान हसिना यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली आणि अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. या बैठकीबद्दल स्वतः परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची ट्विटरवर ट्विट करून माहिती दिली होती. दरम्यान, भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकूणच धोरणात्मक संबंध गेल्या काही वर्षांपासून वाढत आहेत.

Exit mobile version