मध्य प्रदेशातील पोलिस ठाण्यावर दगड फेकणारा शहजाद अली पोलिसांच्या ताब्यात !

घटनेनंतर होता फरार

मध्य प्रदेशातील पोलिस ठाण्यावर दगड फेकणारा शहजाद अली पोलिसांच्या ताब्यात !

मध्य प्रदेशातील छतरपूर येथील पोलीस ठाण्यावर दगडफेक करून फरार झालेला मुख्य आरोपी शहजाद अली याला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी (२७ ऑगस्ट) छतरपूर येथील वाहतूक पोलिस ठाण्याजवळ पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. ६ दिवसांपूर्वी कोट्यवधींची हवेली आणि महागड्या गाडींचा मालक असलेला शहजाद अली ई-रिक्षातून प्रवास करताना पकडला गेला. पोलिसांनी आरोपीला अटक करून कोतवाली पोलीस ठाण्यात नेले आहे.

अनेक दिवस लपून-छपून फरार असलेला शहजाद अली छतरपूर न्यायालयात आत्मसमर्पण करण्याचा विचार करत होता. पोलिसांना चकमा देण्यासाठी तो रिक्षातून प्रवास करत कोर्टाकडे निघाला होता. पोलिसांना याची माहिती मिळताच जागोजागी बॅरिकेड लावून तपासणी सुरु केली. या कारवाई दरम्यान ई-रिक्षामधून शहजाद अली याची ओळख पटताच त्याला अटक करण्यात आली.

आरोपीला अटक करून पोलीस ठाण्यात नेण्यात आले, जेथे त्याची चौकशी करण्यात आली. आरोपी शहजाद अलीवर   १० हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. तसेच त्याच्याविरुद्ध लुक आउट नोटीसही जारी करण्यात आली होती. एसपी आगमन जैन यांनी सांगितले की, आरोपीला न्यायालयात हजर करून रिमांड मागवून त्याची चौकशी केली जाणार आहे. त्याच्यावर या अगोदर सहा गुन्हे दाखल असून त्याचीही चौकशी होणार आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

हे ही वाचा :

कॅनडामधील ७० हजारपेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय विद्यार्थांना निर्वासित होण्याचा धोका

क्षत्रिय मराठा विचारे परिवाराच्या वतीने रश्मी विचारे, गीता विचारे यांचा सन्मान

रत्नागिरीत नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याने खळबळ

भाजपाकडून जम्मू- काश्मीरसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

दरम्यान, महाराष्ट्राचे सरला बेटाचे महंत रामगिरी महाराजांनी मोहम्मद पैगंबरांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ बुधवारी (२१ ऑगस्ट) छतरपूरमधील मुस्लिम समाजाच्या सदस्यांनी निदर्शने केली होती. यावेळी मुस्लिम समाजाने परिसरात हिंसाचार घडवण्याचा प्रयत्न करत छतरपूरमधील पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. या घटनेत पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह तीन पोलीस जखमी झाले होते. महंत रामगिरी महाराजांविरुद्ध तक्रार दाखल करण्यास हा मुस्लिम समाज पोलीस ठाण्यात एकवटला होता. दरम्यान, यावेळी मोठी घोषणाबाजी झाली आणि संतप्त जमावाने दगडफेक केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी शहजाद अली हा फरार होता. प्रशासनाने दुसऱ्याच दिवशी कारवाई करत आरोपी शहजाद अलीच्या आलिशान बंगल्यावर बुलडोजर चालवला, आवारात उभ्या असलेल्या तीन महागड्या गाड्या देखील फोडण्यात आल्या होत्या.

Exit mobile version