कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत कारुळकर यांच्या सुविद्य पत्नी आणि प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा शीतल जोशी कारुळकर यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
नालंदा डान्स रिसर्च सेंटरच्या नालंदा नृत्य कला महाविद्यालयाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या मानद सदस्य म्हणून त्यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. या सन्मानाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. शीतल कारुळकर यांना याआधी दावोस, स्वीत्झर्लंड येथील वर्ल्ड कम्युनिकेशन फोरम आणि सीबीएसईच्या (सेन्सॉर बोर्ड) सदस्यत्वाचा मान मिळालेला आहे. यानंतर त्यांना मिळालेला हा आणखी एक बहुमान आहे.
नालंदा डान्स रिसर्च सेंटरकडून मिळालेल्या या सन्मानाबद्दल शीतल कारुळकर यांनी आनंद व्यक्त केला आहे. नालंदाने दिलेल्या या संधीमुळे मला माझ्या आवडीच्या क्षेत्रात आणखी उंच भरारी घेण्याची प्रेरणा मिळणार आहे. हा सन्मान दिल्याबद्दल शीतल कारुळकर यांनी नालंदा संस्थेच्या संचालिका उमा रेळे, राहुल रेळे यांचे आभार मानले असून पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार विजेत्या दिवंगत कनक रेळे यांचेही स्मरण केले आहे. कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत कारुळकर यांनीही शीतल यांचे अभिनंदन केले आहे.
हे ही वाचा:
आंदोलक कुस्तीपटूंविरोधात दिल्ली पोलिस गुन्हे मागे घेणार
कर्नाटकमधील पाठ्यपुस्तकांमध्ये आंबेडकर, नेहरू परतले
संजय राऊत यांनी आपल्या कार्यकर्त्याकडून स्वतःलाच धमकी दिली
नालंदा डान्स रिसर्च सेंटर ही संस्था मुंबई विद्यापीठाशी संलग्न असून महाराष्ट्र शासनाची या संस्थेला मान्यता आहे.नालंदा डान्स रिसर्च सेंटरच्या संचालिका डॉ. उमा रेळे यांनी या नियुक्तीसंदर्भातील पत्र शीतल कारुळकर यांना कारुळकर प्रतिष्ठानच्या कार्यालयात प्रदान केले. नालंदा महाविद्यालयाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या सदस्य म्हणून आपली नियुक्ती करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
‘दावोस स्वित्झर्लंड, CBSE (सेन्सॉर बोर्ड) आणि आता नालंदा येथे वर्ल्ड कम्युनिकेशन्स फोरमचे सदस्य झाल्यानंतर आनंद झाला असून आवड असलेल्या या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याची संधी मिळाली. उमा रेळे, राहुल रेळे आणि दैवी आत्मा कनक रेळे जी (पद्मश्री आणि पद्मभूषण) यांचे आभार,’ अशी भावना शीतल कारुळकर यांनी व्यक्त केली आहे. शीतल कारुळकर या कारुळकर प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष असून अनेक सामाजिक कार्यात त्या हिरीरीने पुढाकार घेत असतात.