‘द इंद्राणी मुखर्जी स्टोरी : ब्युरीड ट्रुथ’ ही डॉक्युमेंट्री लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या डॉक्युमेंट्रीत शीना बोरा हत्याकांड, त्यानंतर बोराची बहिण आणि तत्कालीन प्रसारमाध्यम कंपनीची प्रमुख राहिलेल्या इंद्राणी मुखर्जी हिची अटक… आदी मुद्द्यांवर नव्याने प्रकाश टाकला जाणार आहे. या डॉक्युमेंट्रीसाठी नेटफ्लिक्सने ‘मेकमेक’ आणि ‘इंडिया टुडे’ यांच्याशी करार केला आहे.
हे ही वाचा:
राबडीदेवीच्या गोशाळेतील कामगाराला लाच म्हणून मिळाली मालमत्ता
‘अधीर रंजन म्हणजे काँग्रेसमधील छुपे शत्रू’
हेमंत सोरेन यांची पत्नी झारखंडच्या मुख्यमंत्री होतील!
इंद्राणी मुखर्जी आणि त्यांचे पती पीटर मुखर्जी यांना सन २०१५मध्ये अटक करण्यात आली होती. या डॉक्युमेंट्रीमध्ये इंद्राणी मुखर्जी, त्यांची मुले विधी मुखर्जी आणि मिखाइल बोरा, अनुभवी पत्रकार आणि वकिलांची मते दाखवली जाणार आहेत. त्यांच्या कौटुंबिक नात्यामधील जटिलता आणि त्यांची परिस्थिती या डाक्युमेंट्रीत दाखवली जाणार आहे. ही डॉक्युमेंट्री शाना लेवी आणि उराज बहल यांनी दिग्दर्शित केली आहे. तर, त्याची निर्मिती टेरी लियोनार्ड यांनी केली आहे.