विराटच्या संघ निवडीवर शशी थरूर वैतागले! म्हणाले…

विराटच्या संघ निवडीवर शशी थरूर वैतागले! म्हणाले…

भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान सुरू असलेली कसोटी मालिका सध्या रंगतदार वळणावर आहे. पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकला असून एक सामना अनिर्णीत राहिला आहे. आज म्हणजेच गुरुवार, २ सप्टेंबर पासून या मालिकेतील चौथ्या सामन्याला सुरुवात झाली आहे. ओव्हल या मैदानावर हा सामना खेळला जात आहे. हा सामना जिंकणारा संघ मालिकेत आघाडी घेणार आहे. त्यामुळेच या सामन्याचे महत्त्व अधिक आहे.

ओव्हल मैदानाची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजी साठी पूरक असल्याचे म्हटले जाते. या मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यांचा इतिहास बघता कायमच खेळपट्टीने फिरकी गोलंदाजांना मदत केल्याचे आढळून येते त्यामुळे चौथ्या कसोटीत भारताचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विन खेळताना दिसणार का? हा प्रश्न उपस्थित होत होता. माध्यमे आणि समाज माध्यमांवर याबाबत बऱ्याच चर्चा आणि तर्कवितर्क पाहायला मिळाले.

नाणेफेकीच्या वेळी जेव्हा कर्णधार विराट कोहली मैदानात आला तेव्हा त्याने संघात दोन बदल केल्याचे सांगितले. हे ऐकताच सर्वांनाच असे वाटले की अश्विनला संघात घेण्यात आले आहे. पण प्रत्यक्षात मात्र कोहलीने जेव्हा बदल जाहीर केले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. भारताचे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि ईशांत शर्मा यांना छोटीशी दुखापत झाल्यामुळे त्या दोघांना विश्रांती देण्यात आली होती. तर त्यांच्या जागी दोन नव्या गोलंदाजांना संघात जागा मिळाली होती. पण यात रविचंद्रन अश्विन नव्हता. त्या ऐवजी उमेश यादव आणि शार्दुल ठाकुर या दोघांना संघात स्थान मिळाले होते.

हे ही वाचा:

का झाले जगभरात इन्स्टाग्राम डाऊन?

आता देवालाच मैदानात उतरावे लागेल!

उद्धव ठाकरे, शरद पवार पाठीत खंजीर खुपसणारेच

अनिल देशमुखांच्या वकिलालाच अटक

विरारच्या निर्णयाने सर्वच आश्चर्यचकित झाले. जर चार वेगवान गोलंदाज ठेवणे गरजेचे वाटत होते तर रवींद्र जडेजाच्या जागी रविचंद्रन आश्विनला संघात घेण्याचा पर्याय उपलब्ध होता. पण विराट कोहलीच्या मते संघात जडेजा असणे हे संघाचा समतोल साधण्याच्या दृष्टीने योग्य ठरते.

विराट कोहलीच्या या संघ निवडीवर समाज माध्यमातून आश्चर्य आणि टीका या दोन्ही गोष्टी पाहायला मिळत आहेत. काँग्रेस नेते खासदार शशी थरूर हे देखील या संघ निवडीवरून वैतागलेले दिसले. ट्विटर आणि फेसबुक च्या माध्यमातून थरूर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“मला विश्वास बसत नाही की इंग्लंडच्या फिरकीला सर्वात अनुकूल असणाऱ्या मैदानावर त्यांनी पुन्हा अश्विनला वगळले. हा संघ अविश्वसनीय आहे. तुम्ही तुमचे पाच सर्वोत्तम गोलंदाज निवडा, त्यात अश्विनचे नाव हे पहिले किंवा दुसरे असेल. त्याला आणि शमीला ओव्हलमध्ये वगळणे म्हणजे इच्छामृत्यू मागण्यासारखे आहे. जणू तुम्हाला हरायचेच आहे!” असे म्हणत थरूर यांनी टीका केली आहे.

Exit mobile version