26 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषपालघर: मासेमारीसाठी पाण्यात उतरलेल्या तरुणाच्या पायाचा शार्कने घेतला चावा!

पालघर: मासेमारीसाठी पाण्यात उतरलेल्या तरुणाच्या पायाचा शार्कने घेतला चावा!

तरुणाचे वाचले प्राण मात्र शार्कचा मृत्यू

Google News Follow

Related

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वैतरणा खाडीत मासेमारी करण्यासाठी उतरलेल्या तरुणावर शार्कने हल्ला केला आहे.शार्कने तरुणाच्या पायाचा लचका तोडल्याने तरुण गंभीर स्वरूपात जखमी झाला आहे.तरुणाने आरडाओरड केल्याने घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या ग्रामस्थांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला.सध्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.मात्र, हल्ला करणाऱ्या शार्कचा मृत्यू झाला आहे.

पालघर येथील मनोर जवळील वैतरणा नदी पात्रात मंगळवारी (१३ फेब्रुवारी) संध्याकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडली.विकी गोवारी (३२) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, विकी गोवारी हा काही तरुणांसोबत वैतरणा खाडीत मासेमारी करण्यासाठी उतरला.त्याचवेळी तरुणाच्या पायाला २०० किलो वजनी शार्कची धडक बसली.त्यानंतर शार्कने लगेच तरुणाचा पाय तोंडात दाबला.यानंतर तरुणाने आरडा-ओरड केली.

हे ही वाचा:

काँग्रेसने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी २००७ मध्येच फेटाळल्या होत्या!

हल्दवानीमध्ये छतावरून दगडफेक करणाऱ्या महिलांवर होणार कारवाई!

माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या नातवाचा काँग्रेसला रामराम

१९६१ नंतर मणिपूरमध्ये स्थायिक झालेल्यांना ‘हद्दपार’ करणार!

शार्कने थोड्या वेळात पाय सोडला परंतु त्या कालावधीत तरुणाचा एक ते दीड फूट पाय कुरतडला गेला होता. त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने हा तरुण बेशुद्ध पडला.घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या लोकांनी त्याला उपचारासाठी सिल्वासा येथील खाजगी दाखल केले.

शार्कच्या हल्ल्याची माहिती मिळताच घटनास्थळी लोकांनी धाव घेतली.समुद्राला उधाण असल्याने हा मासा नदीपात्रात आल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान, उधाणाचे पाणी कमी झाल्यानंतर हा शार्क मासा मृत अवस्थेत आढळला.त्यानंतर मनोर ग्रामपंचायतीच्या गायकवाड डोंगरी येथील ग्रामस्थांनी हा २०० किलो वजनी शार्क नदीपात्राच्या बाहेर काढला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा