एका २६ वर्षीय महिलेचा मांडीपासूनचा पायच शार्कनेच गिळल्याची भयावह घटना मेक्सिकोत घडली. तिच्या पाच वर्षीय मुलीसमोरच ही घटना घडली. या महिलेला तातडीने किनाऱ्यावर आणण्यात आले. मात्र अतिरिक्त रक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाला.ही २६ वर्षीय महिला तिच्या पाच वर्षीय मुलीसोबत पोहण्यासाठी समुद्रात गेली होती. मेलाक समुद्रकिनाऱ्यापासूनच जवळच ही घटना घडल्याचे स्थानिक पोलिस दलाचे प्रमुख राफेल अर्झेया यांनी सांगितले.
या महिलेचे नाव मारिया फर्नांडिस मार्टिनेझ जिमेन्झ असे असूनती जवळच्या शहरात राहात होती. ती किनाऱ्यापासून २५ मीटर लांब अंतरावर समुद्रात तिच्या पाच वर्षांच्या मुलीसोबत पोहत होती. ती तिच्या मुलीला फ्लोटिंग प्ले प्लॅटफॉर्मवर ठेवत असताना शार्कने तिच्यावर हल्ला केला. या अपघातात मुलीला कोणतीही दुखापत झाली नाही. नागरिकांनी या रक्तबंबाळ महिलेला तत्काळ किनाऱ्यावर आणले.
हे ही वाचा:
‘मिचॉंग’ने चेन्नईला झोडपलं; ३३ विमाने बंगळूरूकडे वळवली तर १४४ रेल्वे गाड्या रद्द
केसीआर यांना तेलंगणात मात देणारे रेवंत रेड्डी कोण आहेत?
महाबिझ २०२४ समिटचे दुबई येथे आयोजन!
काँग्रेसच्या पराभवानंतर इंडिया आघाडीवर अखिलेश सिंह यांचा वरचष्मा?
बचाव पथकांनी तत्काळ बचाव कार्य सुरू केले, मात्र तिच्या शरीरातून अति रक्तस्राव झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे पोलिस प्रमुखांनी सांगितले. पोलिसांनी मेलाक आणि जवळच्या बारा दे नॅव्हिडॅड समुद्रकिनारा सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांना पोहण्यासाठी बंद केला आहे.
हा किनारा शहराच्या ज्या महापालिकेंतर्गत येतो, त्यांनी हे जवळपासचे दोन्ही समुद्रकिनारे सुरक्षेच्या कारणास्तव बंद केल्याचे जाहीर केले आहे. मेक्सिकोमध्ये शार्कच्या हल्ल्याच्या घटना या दुर्मिळ आहेत. सन २०१९मध्ये बाजा कॅलिफोर्निया सूर समुद्रकिनाऱ्यावर अमेरिकेतील एक पट्टीचा पोहणारा शार्कच्या हल्ल्यातून वाचला होता.