जिहादी उस्मानीने पुन्हा ओकली गरळ

जिहादी उस्मानीने पुन्हा ओकली गरळ

हिंदू धर्माला ‘सडलेला’ म्हणणाऱ्या शर्जील उस्मानीने पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. लोकप्रिय पत्रकार रोहित सरदाना यांच्या मृत्यूनंतर व्यक्त होताना उस्मानीने पुन्हा एकदा त्याच्या विचारांची पातळी किती खालची आहे हे दाखवून दिले. उस्मानीच्या या वक्तव्यानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दर दिवशी हजारो लोक या जगाचा निरोप घेत आहेत. यात सर्वसामान्य माणसापासून ते अनेक प्रसिद्ध व्यक्ती असे सारेच आहेत. शुक्रवारी अशाच काही नामवंत व्यक्तींनी या जगाला अलविदा म्हटले. यात माजी ऍटर्नी जनरल सोरी सोराबजी, वरिष्ठ पत्रकार रोहित सरदाना यांचा समावेश आहे. सरदाना यांच्या मृत्यूबाबत देशभर शोक व्यक्त केला जात आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या समवेत विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, पत्रकार, अशा साऱ्यांनीच सरदाना यांच्या जाण्याबद्दल शोक व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:

प्रसिद्ध पत्रकार रोहित सरदाना यांचे निधन

माजी अटॉर्नी जनरल सोली सोराबजी यांचे कोरोनामुळे निधन

 

‘या’ शोएबने घेतली अरविंद केजरीवालांची विकेट

मुख्यमंत्र्यांचे आज पुन्हा ‘फेसबुक लाईव्ह’

पण सरदाना यांच्या दुर्दैवी मृत्यूवर व्यक्त होताना उस्मानीने शोक व्यक्त करायचे दूरच उलट गरळ ओकली आहे. पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी सरदाना यांच्या मृत्यूनंतर केलेल्या ट्विटवर उस्मानी व्यक्त झाला आहे. ‘असामाजिक, सतत खोटे बोलणारा आणि नरसंहाराला प्रोत्साहन देणारा असा तो होता. त्याला पत्रकार म्हणून लक्षात राहूच शकत नाही.’ असे ट्विट उस्मानीने केले आहे.

दरम्यान उस्मानीच्या या विखारी वक्तव्यावर ट्विटरवरून संताप व्यक्त केला जात आहे. पण तरीही उस्मानीने माफी मागायचे सोडून आपल्या ट्विटचे लंगडे समर्थन केले आहे.

Exit mobile version