स्वातंत्र्यवीर सावरकरांवर शरद पोंक्षे यांचे शुक्रवारी व्याख्यान

सावरकर विचार मंचतर्फे कार्यक्रमाचे आयोजन

स्वातंत्र्यवीर सावरकरांवर शरद पोंक्षे यांचे शुक्रवारी व्याख्यान

‘आधुनिक हिंदुत्वाचे पुरस्कर्ते स्वातंत्र्यवीर सावरकर’ या विषयावर सुप्रसिद्ध अभिनेते आणि सावरकर अभ्यासक शरद पोंक्षे बोलणार आहेत. शुक्रवार १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ८ वाजता नवी मुंबई येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सावरकर विचार मंच, नवी मुंबईने आयोजित केला आहे.

विसाव्या शतकातील बदलत्या राजकीय आणि भौगोलिक पार्श्वभूमीवर नवा हिंदुत्व सिद्धांत यावर शरद पोंक्षे सविस्तर विचार मांडतील. त्याशिवाय, सावरकर विचारांचा प्रसार करणारा शतजन्म शोधिताना हा कार्यक्रमही होणार आहे. साहसी सावरकर या विषयावर इतिहास अभ्यासक पार्थ बाविस्कर यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून आमदार गणेश नाईक, विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सह कार्यवाह, स्वप्नील सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळाचे कार्यवाह उत्तम पवार आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

हे ही वाचा:

… म्हणून सुरक्षा कवच सोडून जनतेला भेटायला गेले पंतप्रधान मोदी

पालघर साधू हत्याकांड प्रकरण सीबीआयकडे

“बहुमत असून धनुष्यबाण मिळालं नाही याची खंत”

“बहुमत असून धनुष्यबाण मिळालं नाही याची खंत”

 

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सावरकर विचार मंचचे अध्यक्ष संतोष कानडे यांनी केले आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असला तरी कार्यक्रमासाठी प्रवेशिका आवश्यक आहेत. प्रवेशिकेसाठी ९९३०४१०००१ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा पुढील लिंकवर जाऊन नोंदणी करता येईल.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd7upggw9UrK4GBzkI3fvMARTX006wUdUoF0VYbelTaGzoPEA/viewform

Exit mobile version