अनेक पक्ष फोडणारे शरद पवार म्हणतात,‘पक्ष फोडायला अक्कल लागत नाही’!

अहिल्यानगर येथे पार पडली सभा

अनेक पक्ष फोडणारे शरद पवार म्हणतात,‘पक्ष फोडायला अक्कल लागत नाही’!

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या राज्यभर सभा पार पडत आहेत. राज्यात २० नोव्हेंबरला एकाच टप्यात मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. याच दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी एका सभेमध्ये म्हटले आहे की, ‘पक्ष उभा करायला अक्कल लागते. मात्र, पक्ष फोडायला अक्कल लागत नाही.

अहिल्यानगर येथील राहुरीमधील सभेत शरद पवारांनी केलेल्या या वक्तव्याची बरीच चर्चा होत आहे. अनेक पक्ष फोडल्याचे आरोप याआधी शरद पवारांवरच झाले आहेत. एकेकाळी काँग्रेसमध्ये सामील असलेल्या शरद पवारांनी पक्ष फोडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. यावेळी मात्र त्यांचाच पक्ष फुटला आहे. त्याला देवेंद्र फडणवीस कारणीभूत असल्याचा आरोप पवार वारंवार करत आहेत.

 

हे ही वाचा : 

अनिल देशमुखांना क्लीन चीट नाही; फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न

गौप्यस्फोटांना ऊत… मविआचे सरकार अदानींनी पाडले; पवारांच्या पाठिंब्याने?

‘बॅगेत कपडेच आहेत, युरीन पॉट नाही’

हिंदुहितासाठी, राष्ट्रहितासाठी करा १०० टक्के मतदान !

दरम्यान, राहुरीमधील सभेला संबोधित करताना शरद पवार म्हणाले, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात आहे, दिवसाला पाच-सहा सभा घेत आहे. अनेक लोकांशी भेटी घेताना लोक सांगतात की, पक्ष फोडणे हे काय आम्हाला पटलेले नाही.

ते पुढे म्हणाले, फडणवीसांना एका ठिकाणी प्रश्न विचारला की तुमच्या आयुष्यात तुम्ही काय काम केले. त्यावर ते म्हणाले दोन पक्ष फोडले. शरद पवार पुढे म्हणाले, पक्ष उभा करायला अक्कल, कष्ट लागते. मात्र, फोडायला अक्कल लागत नाही.

शरद पवारांनी १९७८ मध्ये वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्रीपद मिळवले होते. नंतर शिवसेनेचे नेते छगन भुजबळ यांना फोडून त्यांनी मोठा धक्का दिला होता. २०१९ ला तर उद्धव ठाकरे यांचा शिवसेना हा पक्षच पळत महाविकास आघाडीचा प्रयोग केला.

Exit mobile version