मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर भाजप आमदार अमित साटम यांनी निशाणा साधला आहे. मनोज जरांगे आपण जेव्हा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुढाकार घेऊन उपोषणाला बसलात तेव्हा एक सामान्य मराठा म्हणून मला अभिमान वाटला. मात्र, तुम्ही शरद पवार यांच्या नादी लागून भरकटला आहात, असा हल्लाबोल भाजप आमदार अमित साटम केला आहे. मराठा समाजाला न्याय आणि दिशा दाखवण्याची कुवत आहे ते जाणतात म्हणून कदाचित तुमचा राजकीय गेम होत असल्याचेही साटम म्हणाले आहेत.
भाजप आमदार अमित साटम म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणाकरिता पुढाकार घेऊन उपोषणाला बसलात तेव्हा एक सामान्य मराठा म्हणून मला अभिमान वाटला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शाचे पालन करीत होतात. महाराज जेव्हा युद्धावर जायचे त्यावेळी सामान्य जनता कोणत्याही परिस्थितीत भरडली गेली नाही पाहिजे असे महाराजांचे आदेश असायचे. परंतु, मनोज जरांगे आपण शरद पवार यांच्या नादी लागलात आणि कुठे तरी भरकटत जात आहात.
हे ही वाचा:
मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजनमधून १०८८ कोटी रुपयांची तरतूद
पाकिस्तानात अल-कायदाच्या म्होरक्याला अटक
पॅरिस ऑलिंपिकमध्ये सहभागी होणार भारतीय लष्कराचे प्रशिक्षणार्थी ‘श्वान’ !
छत्तीसगडमध्ये मॉब लिंचिंग नाही तर ‘त्यांचा’ मृत्यू नदीत उडी मारल्यामुळे !
ते पुढे म्हणाले की, इतर समाजाचा पाठिंबा जो आपल्याला मिळत होता, तुमच्या बोलण्या आणि वागण्यामुळे आता आपण त्यापासून कुठे तरी दुरावत चालला आहात असे मला वाटते. मात्र, अजूनही वेळ गेलेली नाही. जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो की, कपटी शक्तींच्या संमोहनातून आपण बाहेर पडावे. आपल्यात गरीब मराठा समाजाला न्याय देण्याची कुवत आहे. सगेसोयरेंना पुढे आणायचे आणि त्यांनाच राजकारणात मोठे करायचे असा शरद पवारांचा सुप्त अध्यादेश राहिलेला आहे. शरद पवारांनी गरीब कुटुंबातून येणारा गरीब मराठा मोठा केला असेल तर मला दाखवा. मराठा समाजाला न्याय आणि दिशा दाखवण्याची कुवत आहे ते जाणतात म्हणून कदाचित तुमचा राजकीय गेम होत आहे असे अमित साटम म्हणाले.