23 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषफोडाफोडीच्या राजकारणाचा पाया पवारांनीच रचला!

फोडाफोडीच्या राजकारणाचा पाया पवारांनीच रचला!

भाषणात शाहू, फुले, आंबेडकरांचं नाव घेऊन स्वार्थासाठी राजकारण करण्याची ‘ढोंगी‘ वृत्ती

Google News Follow

Related

राज्यातील कंत्राटी भरतीचा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गी लावत कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केला.फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांना तोंडावर पाडले.राज्यातील तरुणांची दिशाभूल केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी नाकघासून जनतेची माफी मागावी अन्यथा आंदोलनाचा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला होता.त्यानंतर राज्यभर भाजपकडून आंदोलन करण्यात आले.बावनकुळे यांच्या आंदोलन प्रकरणी शरद पवार यांना विचारले असता.पवार म्हणाले, चंंद्रशेखर बावनकुळे हे पक्षाच्या उमेदवारी तिकिट देण्यायोग्य नाही. त्यांनी बारामतीची चर्चा करण्याचं काहीही कारण नाही. त्यांना भाजपनं तिकिट नाकारलं त्यामुळे त्यांच्याबाबत काही बोलू नये,अशी टीका शरद पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केली होती.यानंतर भाजप कडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले.

यावर भाजप महाराष्ट्र ट्विटर पेजवर ट्विट केले की, आमचे आदरणीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचं जेवढं वय आहे त्याहून अधिक वर्षे शरद पवारजी यांची राजकीय कारकीर्द आहे. आपल्याहून लहान कार्यकर्त्याला बळ देणं, प्रोत्साहन देणं हे पवारांना माहिती नाही म्हणून ते बावनकुळेजींविरोधात बोलले आहेत. हाच त्यांच्या राजकारणाचा स्वभाव राहिला आहे. त्यामुळे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन तुकडे झाले आणि त्यांच्या राजकीय भूमिकांबद्दल आम्ही बोलायची गरज नाही.

राष्ट्रीय काँग्रेस पार्टीकडूनही उत्तर देण्यात आले.ट्विटमध्ये म्हटले की, “आदरणीय पवार साहेब यांची जेवढी राजकीय कारकीर्द आहे तितकं बावनकुळे यांचं वय आहे. याची जाण तुम्हाला उशिरा का होईना झाली हे महत्वाचं! फक्त एक राहून गेलं, ते म्हणजे आदरणीय साहेबांची संपूर्ण राजकीय कारकीर्द ही तपास यंत्रणांचा गैरवापर करून फोडाफोडीचं राजकारण करून घटनाबाह्य पद्धतीने सरकार स्थापण्याची मुळीच राहिलेली नाही. पवार साहेबांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, युवा यांच्या हिताचे जे सर्वसमावेशक निर्णय घेतले त्याची सर तुम्हाला येणार नाही हे महाराष्ट्र जाणतो.

हेही वाचा.. 

‘गगनयान’ मोहिमेत महिलांचाही सहभाग असू शकतो’!.

देशातील सहा टक्के नागरिक खटल्यांमध्ये गुंतलेले!

शेतजमिनीच्या वाटणीतून चुलत भावाची हत्या!

डॉ. धनंजय दातार यांना ‘मराठी यशवंत पुरस्कार’ जाहीर

या ट्विटला भाजप महाराष्ट्र ट्विटर हॅन्डल पेजवर ट्विट करण्यात आले आहे.ट्विट केले की, फोडाफोडीच्या राजकारणाचा पाया महाराष्ट्रात कुणी रचला असेल तर तो @PawarSpeaks यांनीच. अनेकांची घरं फोडली, काका-पुतण्यांमध्ये पवारांनी उभा केलेला संघर्ष महाराष्ट्रातील जनता विसरली नाही.शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेच मुळी फोडाफोडीचं राजकारण करून. त्यामुळे फोडाफोडीबद्दल तुम्ही न बोललेलं बरं.

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचं नाव घेऊन तुम्ही कायम त्यांच्याविचारांविरोधात भूमिका घेतल्या. ज्या काँग्रेसच्या हाताला धरून तुम्ही राजकारणात आलात त्याच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून सत्ता मिळवली हा इतिहास आहे.विदेशी वंशाच्या मुद्द्यांवर सोनिया गांधी यांना विरोध करून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली आणि पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी दिल्लीत जाऊन सोनिया गांधींच्या समोर गुडघे टेकून मुजरा केला. त्यामुळे स्वाभिमानाची भाषा तुम्हाला शोभत नाही.

धार्मिक राजकारणाचा आरोप करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. कारण मुंबईत बॉम्बस्फोट झाल्यानंतर १३ व्वा बॉम्बस्फोट मुस्लिम वस्तीत झाल्याचा कांगावा मतं मिळवण्यासाठी तुम्ही केला होता.भाषणात शाहू, फुले, आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि राजकारण मात्र घराणेशाही आणि स्वार्थासाठी करायचं ही खरी ‘ढोंगी‘ वृत्ती आहे. लोकांना हे ठाऊक असल्याने पवार, तुमचे नेतृत्व महाराष्ट्राने कधी स्विकारले नाही. तुम्ही अजूनही साडे तीन जिल्ह्यांचेच नेते आहात.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा