तर शरद पवार जाणार बेळगावला!

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून पवारांचा इशारा

तर शरद पवार जाणार बेळगावला!

एकीकडे आपण बाबासाहेबांसारख्या महात्म्याचे स्मरण करत आहोत आणि तिथे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर गोंधळ सुरू आहे.  जे काही महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर घडले ते निषेधार्ह आहे. यामध्ये हे प्रकरण गेले काही आठवड्पासून वेगळ्या प्रकारे हाताळले जात आहे. कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा यात दोष आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त स्टेटमेंट्स केली आहेत. ही परिस्थिती २४ तासात निवळली नाही तर आम्ही बेळगावला जाऊ, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी दिला आहे.

शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्याचा मेसेज मला आला. बेळगावची स्थिती गंभीर आहे. रस्त्यांची नाकेबंदी, महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू आहे. कलेक्टरना निवेदन दिले तर त्यालाही मज्जाव केला जातो.या पार्श्वभूमीवर मराठी भाषिकांवर दहशतीचे वातावरण आहे. यासाठी तुम्ही धीर द्यावा असे पत्र मला मिळालेले आहे.

हे ही वाचा:

मोरबी दुर्घटनेची खोटी माहिती पसरवल्याबद्दल साकेत गोखलेला अटक

बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिका संघटनेने महाराष्ट्रातील गाड्यांवर केला हल्ला

संघाला विरोध मग पीएफआयच्या पाठीशी का?

अदानींकडे आता प्रणव-राधिका रॉयपेक्षा जास्त शेअर्स; किती वाढले?

पवार म्हणाले की, वाहनांवर जे हल्ले झाले यामुळे विचित्र वातावरण तयार झाले आहे. जर हे थांबले नाही तरी संयमाची भूमिका महाराष्ट्राची आहे. २४ तासात हे हल्ले थांबले नाहीत त्या संयमाला वेगळा रस्ता पाहायला मिळेल आणि याची जबाबदारी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि कर्नाटक सरकारची असेल. महाराष्ट्राच्या जनतेची संयमाची भूमिका आहे. पण कर्नाटक मुख्यमंत्र्यांकडून चिथावणीखोर भूमिका घेतली जात असेल तर देशाच्या ऐक्याला मोठा धक्का आहे.

गुजरात, सोलापूर, जतच्या सीमेवर झाले या आताच कशा आल्या. ७-८ वर्षे मी सोलापूरचा पालकमंत्री होतो. हा प्रश्न कधी आला नव्हता. कुणीतरी जाणीवपूर्वक चिथावणी देण्याचा प्रयत्न करत आहे. राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. आम्ही त्यांना भेटू सामंजस्य निर्माण करू नवे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करू. निवडणुका डोळ्यासमोर आहेत का हे माहीत नाही. भाषिकांमध्ये कटुता वाढणे ऐक्याच्या दृष्टीने घातक आहे. त्याचा निषेध करतो.

Exit mobile version