‘अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर शरद पवार, उद्धव ठाकरे, राऊत आणि पटोले शांत’

शायना एनसी यांचा संताप, सावंताविरोधात गुन्हा दाखल

‘अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर शरद पवार, उद्धव ठाकरे, राऊत आणि पटोले शांत’

शिवसेना उद्धव ठाकरे गटातील खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपा महिला नेत्या शायना एनसी यांच्या तक्रारीनंतर अरविंद सावंत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरविंद सावंत यांच्या टिप्पणीवर शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत, नाना पटोले शांत बसल्या प्रकरणी शायना एनसी यांनी संताप व्यक्त केला आहे.

अरविंद सावंत यांनी शायना एनसी यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. या प्रकरणी शायना एनसी यांनी नागपाडा पोलीस ठाणे गाठत आज तक्रार दाखल केली, त्यानंतर सावंताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नागपाडा पोलीस तक्रार दाखल केल्यानंतर शायना एनसी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, महाविनाश आघाडी महिलांचा सन्मान करत नाही, याची आम्हाला जाणीव आहे. आज लक्ष्मी पूजनाच्या शुभ दिनी ‘इम्पोर्टेड माल’ या शब्दाचा वापर अरविंद सावंत करत आहेत.

हे ही वाचा : 

बलुचिस्तानमध्ये स्फोट; शाळकरी मुलांसह पाच जणांचा मृत्यू

कास्टींग काऊच मानसिकतेचे गुलाम असे वक्तव्य करणार ना! सावंतांना फक्त इटालियन माल चालतो का?

राजपाल यादव ताळ्यावर, मागितली माफी !

‘तिरुपती मंदिरात फक्त हिंदूच काम करतील’

‘माल’ या शब्दाचा अर्थ ‘आयटम’ असा होतो, पण मी महिला आहे, माल नाही. आमच्या सारख्या सक्षम महिलांबाबत अभद्र टिप्पणीकरतात तर आता यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे, कायदा आता काम करेल. भारतीय न्यायसंहिता कलम-७९, कलम-३५६ (२) अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आल्याचे शायना एनसी यांनी सांगितले.

अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत, नाना पटोले गप्प बसलेत, मात्र महाराष्ट्राच्या महिला शांत बसणार नाहीत, असे शायना एनसी यांनी म्हटले.

Exit mobile version