भाजपा महायुतीच्या बहुमतामुळे पवार, ठाकरे, पटोले हताश!

भाजपा नेते किरीट सोमय्या यांचे वक्तव्य

भाजपा महायुतीच्या बहुमतामुळे पवार, ठाकरे, पटोले हताश!

राज्याच्या विधानसभेची तयारी सुरु असून अगदी काही दिवसांवर मतदान येवून ठेपलय. सर्व पक्षांचे राजकीय नेते प्रचाराकरिता मैदानात उतरले आहेत. सभेतून आरोप, टीका, टिप्पणी एकमेकांवर सुरु आहे. यातच अनेकजण खालच्या पातळीवर टीका करत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कालच्या सभेत भाजपवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. यावरून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा-महायुतीला स्पष्ट बहुमत मिळत आहे, हे दिसून येत आहे. त्यामुळे विरोधक हताश झाल्याचे सोमय्या म्हणाले आहेत.

एएनआयशी संवाद साधताना भाजपा नेते किरीट सोमय्या म्हणाले, विरोधक निराश झाले आहेत. शरद पवार काहीतरी बडबडत आहेत. उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाला शिव्या देत आहेत. काँग्रेस , राहुल गांधी भाजपाला कुत्रा म्हणत आहेत. कारण ओपिनियन पोलमध्येही भाजपा-महायुतीला स्पष्ट बहुमत दिसून येत आहे. त्यामुळे त्यांची निराशा मी समजू शकतो, असे सोमय्या म्हणाले.

हे ही वाचा : 

ट्रम्प यांचे नवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माइक वॉल्ट्ज भारतासाठी ठरणार फायद्याचे!

शाहरुख खानला धमकावल्या प्रकरणी फैजान खानला अटक

बांगलादेशी मुलींना हिंदू नावाने आधारकार्ड, ईडीची झारखंड, प. बंगालमध्ये छापे

नवी मुंबईमधील रो-हाऊसमधून पोलिसांच्या हाती लागले अडीच कोटींचे घबाड

दरम्यान, अकोला येथील काँग्रेसच्या प्रचारसभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. काँग्रेस उमेदवार साजिद खान पठाण यांच्या प्रचारसभेत भाजपला कुत्रा बनविण्याची वेळ आली आहे, असे नाना पटोले म्हणाले. नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर भाजपकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे.

 

Exit mobile version