विधान परिषदेच्या ११ जागांसाठी पार पडलेल्या कालच्या निडवणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला. जयंत पाटील यांच्या पराभवावर महाविकास आघाडीने देखील नाराजी व्यक्त केली आहे. जयंत पाटलांच्या पराभवावर विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शरद पवारांनी जयंत पाटलांच्या पाठित खंजीर खुपसल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. तसेच शेतकरी कामगार पक्ष संपण्याचे काम देखील शरद पवार यांनी केल्याचा आरोप खोत यांनी केला आहे.
जयंत पाटील शेकापचे वरिष्ठ नेते असल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हटले. ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रात शेतकरी आणि कामगारांच्या चळवळी उभारण्याचे काम जयंत पाटील यांनी केले. परंतु जयंत पाटील यांच्या पाठीत खंबीर खुपसण्याचे काम स्वतःला जाणता राजा म्हणवून घेणाऱ्या शरद पवार यांनी केले आहे. राज्यातील शेकाप पक्ष संपवण्याचे काम शरद पवार यांनी केले आहे, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले.
हे ही वाचा:
फडणवीस फॉर्म्युलाच चालला, पवार पॅटर्न ‘फेल’ !
निवडणुकीपूर्वी जम्मू काश्मीरमध्ये मोदी सरकारची मोठी खेळी; उप राज्यपालांकडे अधिक अधिकार
मराठा आरक्षणावरून जालन्यात तरुणीने संपवले जीवन
“काँग्रेसने सेकंड प्रेफरन्सची मतं समान न वाटता ठाकरे गटाला प्राधान्य दिल्याने निकाल बदलला”
दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळविला. महायुतीचे सर्व ९ उमेदवार विजयी झाले. शेवटच्या टप्प्यात शिवसेना उबाठाचे मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील यांच्या लढत होती. अखेर यामध्ये जयंत पाटलांचा पराभव झाला तर मिलिंद नार्वेकर विजयी झाले.