25 C
Mumbai
Saturday, January 11, 2025
घरविशेषआम्ही तयार केलेले वायुमंडल पंक्चर करणारी शक्ती पवारांच्या लक्षात आली!

आम्ही तयार केलेले वायुमंडल पंक्चर करणारी शक्ती पवारांच्या लक्षात आली!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य

Google News Follow

Related

राष्ट्रवादीचे शरद पवार अचानक संघाची स्तुती करायला लागले. त्यामुळे हे हृदयपरिवर्तन आहे कि एका नव्या तडजोडीच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे, असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘संघ’ ही राष्ट्रकारण करणारी शक्ती असल्याचे समजल्यामुळे शरद पवारांनी कौतुक केले असावे. नागपुरात आज (१० जानेवारी) पार पडलेल्या जिव्हाळा पुरस्कार २०२५ च्या सोहळ्यात ते बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये फेक नरेटीव्ह तयार करण्यात मविआला यश आले. त्यामुळे त्यांना एक ओवर कॉन्फिडन्स आला कि आपण अशा प्रकारचा फेक नरेटीव्ह लोकांमध्ये रुजवून सत्तेमध्ये येवू शकतो. आम्हालाही तो धक्का होताच. आम्ही सुद्धा म्हणजे माझ्या सहित सर्व जण ओवर कॉन्फिडन्समध्ये होतो. आम्ही जिंकतोच आहे असे आम्हाला वाटत होते. संविधान बदलणार, व्होट जिहाद सारख्या अशा गोष्टींमुळे लोकांवर याचा परिणाम होणार नाही अशी आम्हाला खात्री होती. पण याचा असर झालेला आम्ही बघितला.

त्यानंतर महाराष्ट्राच्या निवडणुका जवळ होत्या आणि त्यावेळी विचार परिवाराला आम्ही विनंती केली कि राजकारणामध्ये तुम्ही काम करत नाही किंवा राजकारण हा तुमचा प्रांत नाही. पण आताची परिस्थिती अशी आहे कि अराजकतावादी ज्या ताकदी, शक्ती आहेत. या शक्तींच्या विरुद्ध राष्ट्रीय विचारांच्या शक्तींनी उतरणे गरजेचे आहे.

हे ही वाचा : 

राजकीय जीवन काही लोकांच्या नशिबात असते, त्यांना काहीही करावे लागत नाही!

प्रयागराज महाकुंभात साडेतीन वर्षांचा श्रवण बाळ!

महापुरुषांच्या जयंतीनिमित्त ‘जयंती फलक’ लावण्याचा शासनाचा निर्णय!

‘EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला’

ते पुढे म्हणाले, राष्ट्रीय विचारांच्या ज्या शक्तीं आहेत कि ज्यांचा मूळ विचार, परिवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा आहे.  अशा विविध क्षेत्रातल्या लोकांनी केवळ अराजकतेच्या विरुद्ध लढायचे आहे म्हणून आपआपली भूमिका आपआपल्या क्षेत्रात अतिशय उत्तमपणे निभावली. त्यामुळे फेक नरेटीव्ह तयार झालेल्या फुग्याला एका मिनिटात टाचणी लागली आणि लोकसभेपेक्षा विधानसभेचे निकाल पूर्णपणे वेगळे लागले किमान विधानसभेत मविआ धुवून निघाली.

शरद पवार अतिशय चाणाक्ष आहेत. त्यांनी निश्चितपणे याचा अभ्यास केला असेल कि एवढे मोठे आम्ही तयार केलेले वायुमंडल हे एका मिनिटात पंक्चर कसे झाले, हे करणारी शक्ती कोण?. मग त्यांना लक्षात आले कि ही शक्ती नियमित राजकारण करणारी शक्ती नाहीये तर राष्ट्रकारण करणारी शक्ती आहे. शेवटी प्रतिस्पर्ध्याचे कधीतरी कौतुक करावे लागते म्हणून शरद पवारांनी कौतुक केले असावे असे मला वाटते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
221,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा