शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना पत्र, कौतुक करत मानले आभार!

पत्रातून एक मागणी देखील केली 

शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना पत्र, कौतुक करत मानले आभार!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवले आहे. पंतप्रधानांना पत्र पाठवत शरद पवारांनी त्यांचे कौतुक करत आभार मानले आहे. तसेच पत्राद्वारे काही मागण्या देखील शरद पवारांनी केल्या आहेत.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित राहिल्याबद्दल शरद पवारांनी त्यांच्या पत्रातून आभार मानले आहे. तुमचे सखोल आणि अंतर्दृष्टीपूर्ण भाषण जगभरातील मराठी लोकांना खूप भावले, असा उल्लेख देखील या पत्रात शरद पवारांनी केला आहे. शरद पवार या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असल्याने त्यांनी पंतप्रधानांच्या विशेष उपस्थितीबाबत त्यांचे पत्रातून आभार मानले आहे.

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच दिल्लीत पार पडले. २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ असे तीन दिवसीय हे संमेलन होते. ‘सरहद’ या संस्थेकडून संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी लोकसंस्कृती, संत साहित्याच्या अभ्यासक, संशोधक डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली होती. विशेष म्हणजे तब्बल ७ दशकानंतर प्रथमच मराठी साहित्य संमेलन दिल्लीत पार पडले. या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विशेष उपस्थिती लागली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेचे असलेले महत्व देखील जनतेला सांगितले.

हे ही वाचा  : 

पंजाब: दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांचा मंदिरावर ग्रेनेड हल्ला!

हमासचे केले समर्थन; कोलंबिया विद्यापीठातील भारतीय विद्यार्थिनी अमेरिकेतून घरी परतली

‘छावा’ने रचला इतिहास, कमाईत पोहोचला तिसऱ्या क्रमांकावर

भारत यंदा 800 अब्ज डॉलरपेक्षा अधिक निर्यात करणार

पंतप्रधान मोदींच्या संमेलनातील उपस्थितीमुळे शरद पवारांनी पत्र पाठवून आभार मानले आहेत. यावेळी त्यांनी काही मागण्या देखील केल्या आहेत. खरेतर, दिल्लीत पार पडलेल्या या संमेलनाचे ठिकाण असलेल्या तालकटोरा स्टेडियममधे बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांचे अर्धाकृती पुतळे बसवण्याचा प्रस्ताव सरहद संस्थेने मांडला आहे. पण अनेक साहित्यिकांची मागणी आहे की पूर्ण आकाराचे घोडेस्वारी पुतळे उभारले जावेत. तालकटोरा स्टेडियम हे नवी दिल्ली महानगरपालिकाच्या अखत्यारीत येत असल्याने अश्वारूढ पुतळे बसविण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या देण्यासाठी दिल्ली सरकार आणि एनडीएमसी (NDMC) ला निर्देश देण्याबाबत आपण सांगावे, अशी मागणी ही शरद पवार यांनी पत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.

मेहेंदळे वाचा !आव्हाड, मिटकरी नव्हे | Mahesh Vichare | Jitendra Awhad |  |

Exit mobile version