नव्या संसद भवनाचे शनिवारी उद्घाटन होत असताना विरोधकांची चीडचीड मात्र थांबलेली नाही. या कार्यक्रमाबाबत व्यक्त होतच आहेत. केंद्र सरकारने संसद भवनाची नवी इमारत उभारताना सभागृहाचे सदस्य म्हणून आम्हाला विश्वासात घेतले नाही असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. तर नीतिश कुमार यांनी तर हे संसद भवन बांधण्याची गरजच नव्हती असे विचित्र विधान केले आहे.
पवार म्हणाले की, मी अनेक वर्षांपासून संसदेचा सदस्य आहे. परंतु आम्हांला ही इमारत बांधणार असल्याचे वर्तमानपत्रातून कळले. संसद भवन बांधतांना आम्हांला विश्वासात घेतले नाही. तसेच भूमिपूजन करतांनाही कोणाला विश्वासात घेतले नव्हते. संसदेच्या नवीन इमारतीचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन करावे, हे त्यांनी मान्य केले नाही. त्यामुळे विरोधी पक्षांनी कार्यक्रमाला न जाण्याची भूमिका घेतली. त्या भूमिकेला आमचा पाठिंबा असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तर टोकाची भूमिकाच व्यक्त केली. नवीन संसद भवन बांधण्याची गरज नव्हती, तसेच सरकारला इतिहास बदलायचा आहे असे म्हटले आहे.
हे ही वाचा:
विरोधकांना आझादांनी दाखविला आरसा
डेंग्युच्या अळ्या सापडल्यामुळे १२० सोसायट्यांवर दाखल केले गुन्हे
‘आशिष विद्यार्थीने माझी कधीही फसवणूक केली नाही’
नव्या संसद भवनाच्या सौंदर्याला परंपरा, संस्कृतीची झालर
याबाबत नितीश कुमार म्हणाले की, सुरूवातीला हे (संसद भवन) बांधले जात असल्याची चर्चा होत होती, तेव्हा देखील आम्हाला आवडले नव्हते. हा इतिहास आहे, स्वातंत्र्यानंतर गोष्टी ज्या ठिकाणी सुरू झाल्या त्या तेथेच विकसीत केल्या पाहिजेत. त्या वेगळ्या उभ्या करण्यात काही अर्थ नाही.