‘शरद पवार जातीयवादाचं विद्यापीठ, लिंबाच्या झाडाकडून गोड फळाची अपेक्षा करणे गैर’

भाजप नेते गोपीचंद पडळकरांची सुप्रिया सुळेंवर घणाघाती टीका

‘शरद पवार जातीयवादाचं विद्यापीठ, लिंबाच्या झाडाकडून गोड फळाची अपेक्षा करणे गैर’

‘शिंदेंसे बैर नही, देवेंद्र तेरी खैर नही’, अशी टॅगलाईन देत मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करु  नका, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करा, असे प्रवक्त्यांना आदेश देणाऱ्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी घणाघाती टीका केली आहे. शरद पवार हे जातीयवादाचं विद्यापीठ असून लिंबाच्या झाडाकडून गोड फळाची अपेक्षा करणे हे गैर असल्याचे, भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना लक्ष्य करण्यात येत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, जरांगे-शिंदेंसे बैर नही, देवेंद्र तेरी खैर नही’, याचा अर्थ जरांगे, शिंदे, पवार हे मराठा जातीचे आहेत आणि देवेंद्र फडणवीस ब्राह्मण जातीचे हाते. यांचे चालू असलेले राजकारण महाराष्ट्रातील लोकांना समजलेले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रकरणात दखल घेतली पाहिजे, कारण त्यांचे नाव घेवून राज्यात संभ्रम निर्माण केला जात आहे.

ते पुढे म्हणाले, उपमुख्यमंत्री फडणवीस यांना टार्गेट केले जात आहे, त्यासाठी माणसे पेरली जात आहेत. विशिष्ठ संघटनांना बळ द्यायचे, काही पत्रकारांना हाताशी धरायचं आणि फडणवीस यांच्यावर जातीयवादाची टीका करायची. स्वतःला पुरोगामी म्हणवून घ्यायचे आणि जेव्हा राजश्री शाहू महाराजांचे वारस छत्रपती संभाजी महाराजांना खासदारकी दिली तेव्हा पूर्वी छत्रपती पेशव्यांना नेमायचे आणि आता छत्रपतींना पेशवे नेमत आहेत. अशा पद्धतीने स्टेटमेंट द्यायचे, खरतरं फडणवीस यांनी राज्यसभा देण्याअगोदर राजश्री शाहू महाराजांच्या वारसदारांना तुम्ही कधीही खासदारकी दिली न्हवती आणि म्हणून राज्यात आज जे जातीय वादाचे राजकारण विष पेरलं जात आहे, याकडे जनता सुज्ञ नजरेने बघत आहे.

हे ही वाचा : 

जम्मू काश्मीर निवडणूक: पंतप्रधान मोदी, गडकरींसह ४० नेत्यांकडे सूत्रे !

केनियामध्ये शाळेच्या वसतिगृहाला लागलेल्या आगीत १७ विद्यार्थ्यांचा मृत्यू

चाकरमानी निघाले गावाला; वाहतूक कोंडीचा ताप डोक्याला

तीन दिवसांत भाजपाशी जोडले १ कोटी लोक

पवारांचा एक फोर्मुला आहे, पुरोगामी पणाच्या बाता हाणायच्या आणि जातीय वादावर्ती चर्चा घडवायच्या, फडणवीस तुम्हाला पुरून उरले, फडणवीस कशातच सापडत नाहीत, त्यामुळे त्यांच्या जातीवर बोला. लहानपणापासून शरद पवार यांच्याकडून ज्या सुप्रिया सुळे शिकल्या, शरद पवार हे जातीयवादाचं विद्यापीठ आहे, त्यामुळे लिंबाच्या झाडाकडून गोड फळाची अपेक्षा करणे हे गैर आहे, जसा बाप तशी लेक.

ते पुढे म्हणाले, अजित पवारांना सुद्धा सहानभूती दाखवायची नाही असे देखील सुप्रिया सुळे म्हणत आहेत. अजित पवार महाराष्ट्रभर लाडकी बहिण योजनेसाठी फिरत आहेत, तर सुप्रिया सुळे या स्वतःतील किडकी बहिण म्हणून राज्याला दाखवत आहेत.

Exit mobile version