…म्हणे मावळमधील गोळीबार भाजपाने भडकाविल्यामुळे!

…म्हणे मावळमधील गोळीबार भाजपाने भडकाविल्यामुळे!

शरद पवार यांच्या उलट्या बोंबा

मावळमध्ये झालेल्या गोळीबारावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडीला लक्ष्य केल्यानंतर त्यांच्या बचावासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार बुधवारी धावून आले. मावळमध्ये झालेला गोळीबार हा भाजपानेच लोकांना भडकाविण्यामुळे झाला, अशी उलटी बोंब त्यांनी पत्रकार परिषदेत ठोकली.

‘महाराष्ट्र बंद’वर बोलताना फडणवीस यांनी मावळच्या गोळीबाराची आठवण करून देत महाविकास आघाडीवर शरसंधान केले होते. ती टीका शरद पवारांना चांगलीच बोचल्याचे पत्रकार परिषदेत दिसले. त्यावर पवार म्हणाले की, पण तेव्हा जे काही झाले आणि त्यात शेतकरी मृत्युमुखी पडले त्यांना जबाबदार राजकीय नेते नव्हते, कायदा सांभाळण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली होती. स्थानिक भाजपा नेत्यांनी भडकावलं म्हणून तो संघर्ष झाला. ही वस्तुस्थिती आता लोकांच्या लक्षात आली आहे, असे सांगून पवार यांनी तत्कालिन काँग्रेस सरकारवर असलेला मावळ गोळीबाराचा डाग पुसण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.

हे ही वाचा:

मोदी सरकारच्या योजना मानवाधिकारांचं जतन करणाऱ्या

‘ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या अकार्यक्षमतेमुळे कोळसा टंचाईचे संकट’

कबड्डीचा सराव करत असतानाच मुलीची हत्या करणारा आरोपी ताब्यात

काय आहे १०० लाख कोटींची गती शक्ती योजना?

ते म्हणाले की, ज्यांच्यावर त्या गोळीबाराची जबाबदारी टाकण्यात आली, ज्या राजकीय पक्षांवर आरोप केले गेले त्यांचा या घटनेशी संबंध नव्हता हे लोकांना लक्षात आले आहे. मावळमध्ये गोळीबाराच्या काळात लोकांना भडकाविण्याचं काम भाजपाने केले, पण लोकांच्या ते नंतर लक्षात आले. त्यामुळेच आमचा सुनील शेळके हा उमेदवार तिथे ९० हजार मतांनी निवडून आला.

शरद पवार यांनी लखीमपूर येथे घडलेल्या घटनेला राज्य सरकारला जबाबदार धरताना महाराष्ट्रातील मावळसारख्या घटनेसाठी मात्र तत्कालिन विरोधी पक्ष भाजपाला जबाबदार धरत आपण स्थापन केलेल्या सरकारचा केविलवाणा बचाव करण्याचा प्रयत्न उघड झाला.

 

Exit mobile version