चेंबूरच्‍या शरद नारायण आचार्य उद्यानात बहरणार ‘नागरी वन’

४८ देशी प्रजातींच्‍या १० हजार २६४ रोपांची लागवड

चेंबूरच्‍या शरद नारायण आचार्य उद्यानात बहरणार ‘नागरी वन’

मुंबई महानगरपालिका क्षेत्राच्या पर्यावरणाला अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी पालिका विविध स्तरीय पर्यावरण पूरक उपाययोजना सातत्याने राबवित आहे. याच उपाययोजनांचा भाग म्हणून मुंबईत विविध ठिकाणी टप्प्याटप्प्याने मियावाकी पद्धतीच्या नागरी वनांची लागवड करण्‍यात येत आहे. मुंबईकरांना अव्याहतपणे प्राणवायू देणाऱ्या वृक्षांची जोपासना करण्‍याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे, असे प्रतिपादन अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी केले. मुंबईतील अधिकाधिक नागरी वने ही ‘सामाजिक उत्तरदायित्व निधी’ अर्थात ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ च्‍या माध्‍यमातून फुलविण्‍यासाठी संस्‍था – संघटनांनी पुढे यावे, असे आवाहनही भिडे यांनी केले.

हेही वाचा..

हिंगोलीत मविआचे विसर्जन झाले काय?

फडणवीस यांच्यावरील खालच्या भाषेतील टीका खपवून घेणार नाही

एनएसईत ५० लाख लोक गुंतवणूक करत होते आज ती संख्या ७.५ कोटी

दुष्काळग्रस्त भागांना पाणी पुरविणाऱ्या प्रकल्पांना केंद्राने मदत करावी

एम पश्चिम विभागातील चेंबूर (पूर्व) येथे म्‍हैसूर कॉलनी परिसरात स्थित शरद नारायण आचार्य उद्यानामध्‍ये आयआयएफएल फाऊंडेशन संस्थेच्या सामाजिक दायित्व निधीतून दोन हजार ५०० चौरस मीटर क्षेत्रामध्ये ४८ देशी प्रजातीच्या १० हजार २६४ रोपांची लागवड करण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आज अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त भिडे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या.

हरित क्षेत्रात वाढ होण्यासह पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, यासाठी पालिका कटिबद्ध आहे. या अंतर्गत नागरी वनांची निर्मिती करण्‍यावर भर दिला जात आहे. चेंबूर येथील शरद नारायण आचार्य उद्यानात आज करण्‍यात आलेल्‍या वृक्षारोपणात देशी प्रजातींच्‍या वृक्षांचा म्‍हणजेच फळझाडे, फुलझाडे, औषधी गुणधर्म असणा-या वृक्षांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने चिंच, पळस, करंज, बेहडा, सावर, रतनगुंज, साग, सीताफळ, बेल, पारिजातक, कडूनिंब, बांबू, पेरू, पुत्रजीवा, सीता अशोक, हरडा, खैर, जांभूळ, मोह, बहावा, सुरु, बदाम, रिठा, शीसम, बकुळ, अर्जुन, फणस, आवळा, कदंब यासारख्या विविध प्रकारच्या झाडांचा समावेश आहे.

Exit mobile version