शांतिगिरी महाराजांनी मतदान कक्षाला घातला हार, गुन्हा दाखल!

नाशिक मधून अपक्ष उभे आहेत शांतिगिरी महाराज

शांतिगिरी महाराजांनी मतदान कक्षाला घातला हार, गुन्हा दाखल!

देशभरात लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचे मतदान पार पडत आहे.महाराष्ट्रात देखील मतदान जोरात सुरु आहे.दरम्यान,नाशिकमध्ये एक विचित्र प्रकार घडला आहे.नाशिक लोकसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शांतिगिरी महाराज यांनी त्र्यंबकेश्वर मधील मतदान केंद्रातील मतदान कक्षावर हार घालत पूजा केल्याचा प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी शांतिगिरी महाराजांसह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

शांतिगिरी महाराज मतदान करण्यासाठी केले असता त्यांनी मतदान केंद्रातील मतदान कक्षावर हार घातला.गळ्यातील हार काढून मतदान कक्षाला घालणे हे गैरवर्तन असून ते आचार संहितेचे उल्लंघन आहे, म्हणून या प्रकरणी शांतिगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच मतदान केंद्रावर महाराजांचे काही कार्यकर्ते भगव्या रंगाचे कपडे घातले होते.त्यावर ‘जय बाबाजी’ नावाचा लोगो होता.तसेच महाराजांच्या नावाच्या आणि बादली चिन्ह असलेल्या स्लिप मतदारांना वाटत असल्याचे आढळून आले होते.यावर पोलिसांनी आक्षेप घेत त्यांना ताब्यात घेतले अन गुन्हा दाखल करण्यात आला.

हे ही वाचा:

‘इंडी आघाडीच्या मतदारांमध्ये संभ्रम असल्यामुळे मतटक्का घसरला!’

भारत इराणच्या पाठीशी, राष्ट्राध्यक्षांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त!

‘बाळासाहेबांचा वारसा सांगता आणि काँग्रेसला अभिमानाने मतदान करता?’

बारावीच्या निकालाची प्रतीक्षा संपणार; तारीख ठरली

दरम्यान, ईव्हीएम मशीनवर हार का घातला? असा प्रश्न शांतिगिरी महाराज यांना विचारण्यात आला.यावर ते म्हणाले की, आजचे मतदान हे पवित्र आहे.परिसरातील सर्व नागरिक मतदान केंद्रावर येऊन ईव्हीएम मशीनद्वारे मतदान करणार आहेत.म्हणून त्यांना सद्बुद्धी व्हावी आणि आपले मत भारत मातेच्या कामास यावं.अशा सर्व भावना सर्वांच्या मनात रुळावा आणि भविष्यात कोणावरही पश्चातापाची पाळी येऊ म्हणून एक पवित्र हार भारत माता म्हणून आम्ही घातला आहे, असे महाराज म्हणाले.

Exit mobile version