26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषऑटिझमच्या मुलांसाठी कौशल्यविकासाचे ‘सोपान’

ऑटिझमच्या मुलांसाठी कौशल्यविकासाचे ‘सोपान’

Google News Follow

Related

आमदार भातखळकर करणार शनय सेंटरचे उद्घाटन

कुकिंग शो करणारे संजीव कपूर यांच्या कंपनीत एका मुलीला चांगली नोकरी मिळाली, गारमेंटच्या दुकानात एका मुलाला काम करण्याची संधी मिळाली तर एका मुलाला शिपाई म्हणून काम देण्यात आले, अनेक मुले पदवीधर झाली, पदव्युत्तर पदवीही त्यांनी घेतली…हे सगळे ज्या मुलांच्या बाबतीत घडले ती मुले स्वमग्नता (ऑटिझम) असलेली मुले आहेत. पण त्यांनी आपल्या कौशल्याच्या बळावर या सगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या आणि पेलल्या. अशा मुलांसाठी अहोरात्र काम करणाऱ्या ‘सोपान’ या संस्थेच्या माध्यमातून विविध संस्थांची, उपक्रमांची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. आता नवीन पनवेल येथे शनय ऑटिझम रिसोर्स सेंटर या नव्या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या सेंटरचे उद्घाटन भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते होणार आहे. ५ डिसेंबरला सकाळी ११.३० वाजता हा कार्यक्रम होणार असून त्यासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर हेदेखील उपस्थित राहणार आहेत.

शनय ऑटिझम रिसोर्स सेंचर हे स्वमग्न असलेल्या व्यक्तींनी सक्षम करण्याच्या सोपान संस्थेच्या प्रवासातील मैलाचा दगड आहे. कोटक महिंद्र बँकेच्या अनुदानातून बांधलेले आणि सुसज्ज असेल शनय सेंटर आंतरराष्ट्रीय मानकांनुसार नियोजित व डिझाईन केले गेले आहे. या सेंटरच्या माध्यमातून स्वमग्न मुलांसाठी स्वमग्नता हस्तक्षेप व डे स्कूल सेवा प्रदान करणार आहे. शनय मध्ये पालकांना त्यांच्या विशेष गरजा असलेल्या मुलांची काळजी घेण्यापासून आराम देण्यासाठी तात्पुरती निवासी सुविधा समाविष्ट आहे.

‘सोपान’ ही संस्था २००२मध्ये स्वमग्न मुलांसाठी व त्यांच्या पालकांना आधार देण्यासाठी उभी राहिली. स्वमग्नतेसाठी समर्पण केंद्र २००३मध्ये उभे राहिले. अशा मुलांकडे संपूर्ण लक्ष या माध्यमातून दिले गेले. त्यानंतर २०१०मध्ये जोगेश्वरी येथे मुंबई महानगरपालिकेने अशा मुलांसाठी जागा उपलब्ध करून दिली तिथे अशी स्वमग्नता असलेली मुले शिक्षण घेतात. स्पंदन या संस्थेच्या माध्यमातून अशा मुलांसाठी मोफत उपचार तसेच समुपदेशन केले जाते.

या विविध उपक्रम व संस्थांच्या माध्यमातून कौशल्य विकास, संगणक प्रशिक्षण, स्क्रीन प्रींटिंग, कला आणि हस्तकला, पाककला व होम मॅनेजमेंट यांचे प्रशिक्षण दिले जाते.

हे ही वाचा:

मिर्झापूरच्या ललितचा मृतदेह आढळला

धक्कादायक!! मुलीचे अपहरण नव्हे तर आईनेच केली हत्या!

परमबीर अखेर निलंबित; भत्ते मिळणार पण अन्यत्र नोकरी करता येणार नाही

वरळी सिलेंडर स्फोट हलगर्जीपणाबद्दल भाजपा आरोग्य समिती सदस्यांचा राजीनामा

 

२०१५मध्ये सोपानने सुविद्या कॉलेज ऑफ स्पेशल एज्युकेशनची स्थापना केली. ऑटिझममधील स्पेशलायझेशनसह मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या मान्यताप्राप्त कोर्सची सुरुवात करण्यात आली. संकेत युनिटच्या माध्यमातून कार्यक्षम प्रौढांना संगणक प्रशिक्षण दिले जाते.

सुविद्या कॉलेज ऑफ स्पेशल एज्युकेशन शनय येथे कालांतराने स्थलांतरित केले जाईल. या उपक्रमांमध्ये सामुदायिक सर्वेक्षण, शिबिरे, सामान्य शाळांसोबत सहकार्य यांचा समावेश असेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा