ट्रॉफीवर पाय ठेवल्याने मार्शवर शामीची टीका!

मार्शविरोधात पोलिस तक्रार

ट्रॉफीवर पाय ठेवल्याने मार्शवर शामीची टीका!

भारताचा अंतिम सामन्यात पराभव करून सन २०२३चा विश्वचषक पकटावल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू मिचेल मार्शने विश्वचषकावर पाय ठेवल्याचे छायाचित्र व्हायरल झाले होते. विश्वचषकाचा मान न राखल्याबद्दल भारतीय क्रिकेटप्रेमींनीही मार्शवर टीका केली होती. आता भारताचा गोलंदाज मोहम्मद शामीनेही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

मोहम्मद शामी त्याच्या अमरोहा गावात आल्यानंतर त्याला या छायाचित्राबद्दल विचारण्यात आले. तेव्हा शामीने ऑस्ट्रेलिया क्रिकेटपटूंच्या या विजयोत्सवाने आपण दुखावलो गेल्याचे सांगितले.‘ते छायाचित्र पाहून मला खूप दुःख झाले. सर्व देश तो करंडक जिंकण्यासाठी लढत होते. प्रत्येकाला हा करंडक त्यांच्या डोक्यावर घेऊन नाचवायचा होता. त्याने या करंडकावर पाय ठेवलेले मला अजिबातच आवडलेले नाही. त्याने तसे केले पाहिजे नव्हते,’ असे शामीने प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

हे ही वाचा:

बाळासाहेब ठाकरेंना ‘जनाब’ म्हटलं गेलं तेव्हा महाज्ञानी विश्वप्रवक्ते कुठे होते?

ताडोबातल्या वाघाने जोडीदाराच्या शोधात केला २ हजार किलोमीटरचा प्रवास

ऑक्सिजन प्रकल्प कंत्राटात गैरव्यवहार प्रकरणी रोमीन छेडाला अटक

स्वतःला सोनिया हृदयसम्राट, राहुल हृदयसम्राट, शरद हृदयसम्राट अशा पदव्या लावा!

मार्शविरोधात पोलिस तक्रार
विश्वकरंडकावर पाय ठेवल्याबद्दल अलिगडमधील दिल्ली गेट पोलिस ठाण्यात एका संघटनेचे नेते असणाऱ्या पंडित केशव देव यांनी तक्रार दाखल केली आहे. ‘आमच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. सायबरसेलने त्यांचा अहवाल सुपूर्द केल्यानंतरच पुढील प्रक्रिया पार पाडली जाईल,’ असे पोलिस अधीक्षक मृगांक शेखर यांनी सांगितले. मार्श याने विश्वकरंडकावर पाय ठेवून भारतातील नागरिकांचा आणि विश्वकरंडाकाचा अपमान केला आहे, असे केशव यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

Exit mobile version