बकरी ईदला लज्जास्पद कृत्य, बळीच्या बोकडावर लिहिले ‘राम’

पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

बकरी ईदला लज्जास्पद कृत्य, बळीच्या बोकडावर लिहिले ‘राम’

मुंबईत बकरी ईदच्या दिवशी एक लज्जास्पद कृत्य उघडकीस आले आहे. मांसाच्या दुकानात बळीसाठी आणलेल्या एका बोकडाच्या अंगावर राम लिहिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच मांसाचे दुकान देखील सील करण्यात आले आहे. पोलिसांकडे आलेल्या तक्रारीत त्या बोकडासोबत गैरवर्तन केल्याचाही आरोप आहे.

नवी मुंबई पोलिसांनी कारवाई करत मांसाचे दुकान सील केले आहे. बोकडाच्या शरीरावर राम लिहिल्याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बकरी ईद निम्मित बळीदेण्यासाठी सीबीडी बेलापूर येथील एका मांसाच्या दुकानात शनिवारी(१५ जून) २२ बोकड आणण्यात आले होते.

हे ही वाचा:

जम्मू-काश्मिरातील रियासी हल्ल्याची तपासणी एनआयएच्या हाती!

‘बळीं’च्या जनावरांच्या यादीत गायीचा समावेश!

झारखंडच्या सिंगभूममध्ये चकमक, ४ नक्षलवादी ठार!

मोदी-पोप भेटीच्या पोस्टवर काँग्रेसचा माफीनामा

मात्र, एका बोकडाच्या अंगावर ‘राम’ असा शब्द लिहिण्यात आला होता. त्यानंतर याबाबत आमच्याकडे तक्रारी आल्या. तक्रारीच्या आधारे आम्ही कारवाई करत मांसाचे दुकान सील केले आणि दुकान मालकासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तिन्ही आरोपींनी बकऱ्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोपही तक्रारदाराने केला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद शफी शेख, साजिद शफी शेख आणि कुय्याम यांच्याविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याबद्द्दल आयपीसी कलम-२९५ (ए ) यासह कलम-३४ आणि प्राणी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या दुकानाचा परवाना रद्द करण्यासाठी पोलिसांनी महापालिकेला पत्रही दिले आहे.

Exit mobile version