निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी अंधारेंची धडपड, मंत्री शंभूराज देसाईंचा आरोप!

सुषमा अंधारेंमुळे माझी प्रतिमा मलिन, नोटीस पाठवणार : शंभुराज देसाई

निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी अंधारेंची धडपड, मंत्री शंभूराज देसाईंचा आरोप!

ड्रग्ज माफिया ललित पाटीलला मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.मात्र,ललित पाटीलला पळवून लावण्यात अनेक राजकीय नेत्यांचा सहभाग असून यामध्ये मंत्री शंभूराज देसाई सुद्धा आहेत असा गंभीर आरोप सुषमा अंधारेंनी केलं होता.या प्रकरणी मंत्री शंभूराज म्हणाले, ललित पाटीलला मी ओळखत नाही. कारण नसताना माझे नाव घेतले जात असून सुषमा अंधारेंना नोटीस नोटीस पाठवणार असल्याची माहिती शंभुराज देसाई यांनी दिली.

मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या ड्रग्स माफिया ललित पाटीलला कोर्टाकडून सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र,त्याला पळवून लावण्यात राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या महिला नेत्या सुषमा अंधारे मागील अनेक दिवसांपासून करत आहेत. यामध्ये मंत्री दादा भुसेंचे देखील नाव घेण्यात आले होते.त्यानंतर आता मंत्री शंभूराज देसाई यांचा देखील सहभाग असल्याचा गंभीर आरोप सुषमा अंधारेंनी केला आहे.यावर मंत्री शंभूराजे देसाई म्हणाले,ललित पाटीलला मी ओळखत नाही. कारण नसताना माझे नाव घेतले जात असून सुषमा अंधारेंना नोटीस नोटीस पाठवणार असल्याची माहिती शंभुराज देसाई म्हणाले.

हे ही वाचा:

मुंबईत सैराट चित्रपटाची पुरावृत्ती; नव जोडप्याची हत्या, दोन्ही मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी टाकले

बायडेन यांच्या पाठोपाठ ऋषी सुनकही करणार इस्रायल दौरा?

गाझा पट्टीतील रुग्णालयावरील हल्ला कोणी केला?

ठरले; भारत २०३५ पर्यंत अंतराळ स्थानक उभारणार, २०४० पर्यंत चंद्रावर मानव पाठवणार

सुषमा अंधारेंचे वक्तव्य हास्यास्पद आहे. लवकरच मी त्यांना कायदेशीर मार्गाने उत्तर देणार आहे. ललित पाटिलला मी ओळखत नाही कारण नसताना माझे नाव घेतले जात आहे. सुषमा अंधारेंना कायदेशीर नोटीस देणार आहे. ललित पाटील प्रकरणात माझा थोडा संबंध जरी सापडला तला मी राजकारण सोडेल, असे शंभुराज देसाई म्हणाले. सुषमा अंधारे यांचे वक्तव्य बेजबाबदार आहे. अंधारे या निवडून येऊ शकत नाहीत म्हणून उध्दव ठाकरे यांनी त्यांना खासदारकी किंवा आमदारकी द्यावी यासाठीचा त्यांचा असा प्रयत्न सुरू आहे. लाखो लोकांमधून आम्ही निवडून येतो. अंधारेंची त्यांची सगळी तिकिट मिळवण्यासाठी धडपड आहे, असे शंभुराज देसाई म्हणाले.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

ललित पाटीलला पळवून लावण्यात राजकीय नेते सहभागी आहेत. ललित पाटीलसोबत दादा भुसे आणि शंभूराजे देसाई यांची देखील नार्को टेस्ट करा. याचा तपास केंद्रीय यंत्रणांकडे सोपवा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. इतकंच नाही तर ससून रुग्णालयाच्या डीनची नार्को टेस्ट करा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.

Exit mobile version