मुंबईकडे जाणाऱ्या शालिमार एलटीटी एक्स्प्रेसच्या पार्सल व्हॅनला शनिवारी सकाळी नाशिकरोड स्टेशनवर आग लागली. शनिवारी सकाळी ८.४५ वाजता रेल्वेच्या इंजिनाशेजारी असलेल्या पार्सल व्हॅन कोचला आग लागली होती.प्रवासी डब्यातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासी डब्यातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. सध्या आग विझवण्यात आली आहे. पार्सल व्हॅनला इतर डब्यांपासून वेगळे केले जात आहे. मात्र, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मुंबईतील शालिमार (पश्चिम बंगाल) ते लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकादरम्यान धावणाऱ्या रेल्वेच्या इंजिनाशेजारी असलेल्या पार्सल व्हॅनला (कोच) सकाळी ८.४५ च्या सुमारास आग लागली.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ज्या बोगीमध्ये आग लागली आहे, त्यात सामान ठेवण्यात आले आहे. बोगी रेल्वेपासून वेगळी करण्यात आली असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.
हे ही वाचा:
नवाब मलिक यांची एवढी संपत्ती होणार जप्त
मुंबई पोलिसांच्या ‘ऑपरेशन रीयुनाईट’ची यशस्वी कामगिरी
भारताने कुवेतला कुवत दाखवत जिंकले सुवर्ण
ठाकरेंना सोडवेना अनैसर्गिक नात्याचा मोह…
याआधी लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), कुर्ला येथे शालिमार एक्स्प्रेसमध्ये स्फोटक असल्याचा संशयास्पद वस्तू सापडल्यानंतर अलार्म वाजला होता. यानंतर रेल्वेच्या तपासासाठी बॉम्ब शोधक आणि निकामी पथकाला (बीडीडीएस) पाचारण करण्यात आले. ही ट्रेन हावडा ते मुंबई दरम्यान धावते.