एशियन गेम्स चॅम्पियन अंजूने २०१७ मध्ये विजयवाडा येथे झालेल्या राष्ट्रीय कनिष्ठ अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये शैलीला खेळताना पाहिले होते. या स्पर्धेत १२ ते १४ वयोगटात ४.६४ मीटर लांब उडी मारून शैलीने पाचवा क्रमांक पटकावला होता. मात्र तिच्यातील जिद्द पाहून अंजू बॉबी जॉर्ज यांनी तिला प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. शैलीने रविवारी युवा स्पर्धेच्या अंतिम फेरीत ६.५९ मीटरची उडी मारून रौप्य पदकाला गवसणी घातली. तिचे सुवर्णपदक केवळ एक सेंटीमीटरने हुकले.
अंजू यांनी शैलीला ती १३ वर्षांची असताना प्रथम पहिले होते. तिच्यातील गुण हेरून त्यांनी तिला अंजू बॉबी जॉर्ज स्पोर्ट्स फाउंडेशनशी जोडले होते. त्यानंतर त्यांनी शैलीला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. एक दिवस शैली माझा ६.८३ मीटरचा राष्ट्रीय विक्रम मोडेल आणि माझा विक्रम मोडल्यास मला आनंद होईल, अशी खात्री अंजू यांनी व्यक्त केली. शैली व्यासपीठावर पदक घेण्यास उभी राहिल्यावर अंजू भावूक झाल्या होत्या.
हे ही वाचा:
हे आहे नवे हिंदूत्त्व आणि असा आहे नवा महाराष्ट्र!!!
सॅल्युट!! लष्करातील महिला आता होणार ‘कर्नल’
मुंबई-पुणे द्रुतगती अपघात मार्ग?
आम्ही अशा कारवाईला घाबरत नाही! – जे.पी.नड्डा
६.५९ मीटरपेक्षा चांगली उडी मारून सुवर्ण पदक जिंकू शकले असते. माझ्या आईने मला सुवर्णपदकानंतर स्टेडियममध्ये गायल्या जाणाऱ्या राष्ट्रगीताबद्दल सांगितले होते, पण मी ते करू शकले नाही, असे दुःख शैलीने स्पर्धेनंतर व्यक्त केले. शैलीचे लँडिंग थोडे चुकीचे झाले नाहीतर शैलीने सुवर्णपदक जिंकलं असतं. नीरज चोप्रानंतर अॅथलेटिक्समध्ये ती देशातील पुढचं मोठं नाव बनू शकते, असे वक्तव्य शैलीचे प्रशिक्षक बॉबी जॉर्ज यांनी केले.
शैलीचा जन्म झाशी येथे झाला होता. शैलीला वडिल नसल्याने केवळ आईने तिचा सांभाळ शिवणकाम करुन केला आहे. शैलीच्या आईने तीन भावडांचा सांभाळ करताना खूप कष्ट घेतले आहेत. शैलीने देखील आहे त्या परिस्थितीत मेहनत घेत अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे.