दिल्ली दंगलीतील आरोपी शाहरूख पठान याला आज एखाद्या नायकाप्रमाणे स्वागत करण्यात आले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून पोलिसांनी या व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी केली आहे.
ईशान्य दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायद्या विरोधात उसळलेल्या दंगलीत शाहरुख पठाण त्याला अटक झाली होती. त्यावेळी शाहरुखचा दिल्ली पोलिसांवर पिस्तूल रोखलेला एक फोटो समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला होता. सोमवार, २३ मे रोजी त्याला पॅरोलवर बाहेर सोडण्यात आले. अवघ्या चार तासांसाठी त्याला पॅरोल मंजूर करण्यात आले होते.
हे ही वाचा:
वीरप्पन गॅंग फुल फॉर्ममध्ये! मलनिस्सारण विभागात २१ हजार कोटींचा घोटाळा
समीर वानखेडे यांच्याविरोधात कठोर कारवाईचे आदेश
‘मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला’
आर्यन खान सह ६ जणांना ड्रग्स प्रकरणात क्लीन चिट
या चार तासांच्या कालावधीत तो आपल्या मोहल्ल्यात आजारी वडीलांना भेटण्यासाठी आला होता. यावेळी काही पोलिस अधिकारीही त्याच्यासोबत होते. पण मोहल्ल्यात दाखल होताच शाहरूख पठानच्या समर्थनात लोकांची गर्दी उसळली. यावेळी शाहरूखच्या समर्थानात घोषणाही देण्यात आल्या
हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलाच निषेध व्यक्त केला जात आहे. एका आरोपीला आणि त्यातही दंगलीच्या गुन्ह्यातील आरोपीला अशाप्रकारे वेलकम करणे हे जनतेला पटलेले नाही. त्याचा तीव्र शब्दात निषेध करताना लोक दिसत आहेत. शाहरुख पठाणच्या अशाप्रकारच्या स्वागतामुळे समाजात एक चुकीचा संदेश जात असल्याचे म्हटले जात आहे.