शाहीन आफ्रिदीने ज्युनिअर बुमराहला दिली खास भेट!

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून व्हिडीओ पोस्ट

शाहीन आफ्रिदीने ज्युनिअर बुमराहला दिली खास भेट!

क्रिकेट विश्वात सध्या आशिया कप- २०२३ चा थरार सुरू आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकेत सामने सुरू असून रविवार, १० सप्टेंबर रोजी पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कोलंबोत महामुकाबला सुरु होता. मात्र, रविवारी पावसामुळे सामन्यात व्यत्यय आल्याने उर्वरित खेळ राखीव दिवशी होणार आहे. यामुळे रविवारी चाहत्यांच्या चेहऱ्यावर  नाराजी पसरली असली तरी सध्या पाकिस्तानचा गोलंदाज शाहीन आफ्रिदी आणि भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराह हे चर्चेत आले आहेत.

पाकिस्तानचा गोलंदाज शाहीन आफ्रिदी याने रविवारी खास बुमराह याची भेट घेतली. यावेळी शाहीन याने ज्युनिअर बुमराह म्हणजेच त्याचा मुलगा अंगद याच्यासाठी एक खास गिफ्ट आणले होते. सामना पावसामुळे थांबवला होता. त्यावेळी शाहीन आफ्रिदी याने जसप्रीत बुमराह याची भेट घेऊन त्याला खास भेटवस्तू दिली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याबाबतचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.  शाहीन आफ्रिदीच्या या कृतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. भारतीय चाहत्यांनी देखील त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

“बुमराह भाई आणि भाभी तुमचं खूप खूप अभिनंदन! देव तुमच्या मुलाला नेहमी आनंदी ठेवो,” अशा शुभेच्छा देत शाहीन आफ्रिदी याने बुमराह याला शुभेछा दिल्या. जसप्रीत बुमराह यानेही शाहीन आफ्रिदीकडून आलेली भेट स्वीकारत त्याचे मनापासून आभार मानले.

हे ही वाचा:

‘भारताने जी २० अजेंड्यांचे युक्रेनिकरण होऊ दिले नाही’

जोकोव्हिचची विक्रमी २४व्या ग्रँडस्लॅमला गवसणी

कोपर्डी हत्याप्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदेची येरवडा कारागृहात आत्महत्या !

जळगावच्या भाषणात उद्धव ठाकरेंची जळजळ

भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ सप्टेंबर रोजी होणारा साखळी सामना पावसामुळे रद्द झाला होता. या सामन्यानंतर जसप्रीत बुमराह भारतात परतला होता. नेपाळ विरोधातील सामन्यासाठी बुमराह उपल्बध नव्हता. दरम्यान, बुमराह दाम्पत्याला पुत्ररत्न प्राप्त झाल्याची माहिती समोर आली. बुमराहने स्वत: ट्वीट करून याची माहिती दिली होती. त्यांनी बाळाचे नाव अंगद ठेवले असून त्यानंतर काही दिवसांतचं बुमराह पुन्हा एकदा मैदानात परतला आहे.

Exit mobile version