आर्यनबाबत शाहरुखने केलेले ते वक्तव्य खरे ठरतेय?

आर्यनबाबत शाहरुखने केलेले ते वक्तव्य खरे ठरतेय?

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने क्रूझवर छापा मारून तेथे होत असलेल्या रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केल्यावर त्यात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला ताब्यात घेण्यात आले. यानिमित्ताने शाहरुखच्या एका जुन्या मुलाखतीची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

अभिनेत्री सिमी गरेवाल यांनी घेतलेल्या या मुलाखतीत शाहरुख आपली पत्नी गौरीसोबत विविध प्रश्नांची उत्तरे देतो. त्यावेळी नुकताच आर्यन याचा जन्म झालेला असल्यामुळे मुलाबद्दल सिमी गरेवाल शाहरुखला प्रश्न विचारतात. त्यावर शाहरुख म्हणतो की, मी जे करू शकलो नाही ते माझ्या मुलाने करावे असे मला वाटते. त्याने मुलींशी मैत्री करावी, ड्रग्सचे सेवन करावे, तरुणपणात जे काही करता येईल ते करावे.

हे सगळे शाहरुखने गमतीत म्हटले असले तरी आज नेमके ड्रग्स प्रकरणातच त्याचा मुलगा आर्यन खान याला पकडण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ही मुलाखत चर्चेचा विषय बनली आहे.

 

हे ही वाचा:

राणीच्या बागेतील पेंग्विन टकाटक; ३० कासवे, १४ प्राणी मात्र दगावले

‘कॉर्डेलिया क्रूझचा ड्रग्स प्रकरणाशी काडीमात्र संबंध नाही’

…आणि आर्यन खानसोबत सेल्फी काढण्याचा मोह अधिकाऱ्यालाही आवरला नाही!

मेट्रोची कामे मुदतीपूर्वी करा नाहीतर दोन कोटींचा दंड!

 

शाहरुख आणि आर्यन यांनी याआधी लायन किंग या चित्रपटात प्रमुख पात्रांना आवाज दिलेले आहेत. त्यात मुफासा या सिंहासाठी शाहरुखचा आवाज वापरण्यात आला आहे तर त्यातील सिम्बा या सिंहाच्या छाव्यासाठी आर्यनचा आवाज देण्यात आला आहे. आयसीसीच्या वर्ल्डकप २०१९साठीही त्याने टीम इंडियाची जर्सी परिधान केली होती. त्याद्वारे या चित्रपटाची प्रसिद्धीही करण्यात आली होती. आर्यनच्या जर्सीवर सिम्बा असे लिहिले होते तर शाहरुखच्या जर्सीवर मुफासा असे लिहिण्यात आले होते.

Exit mobile version