संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जन्मलेला शेवटचा सिंह मृत्युमुखी

बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जन्मलेला जेस्पा नावाचा सिंह मृ्त्युमुखी पडला आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जन्मलेला शेवटचा सिंह मृत्युमुखी

बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (एसजीएनपी) एक दुःखद घटना घडली आहे. याच राष्ट्रीय उद्यानात जन्मलेला जेस्पा नावाचा सिंह मृ्त्युमुखी पडला आहे.

या राष्ट्रीय उद्यानात अनेक वन्यजीवांचे वास्तव्य आहे. ह्या अभयारण्यात वन्य प्राणी , वेगवेगळे पक्षी, गुंफा इत्यादीपाहायला मिळतात. रविवारी दिनांक २७ नोव्हेंबर रोजी ह्या राष्ट्रीय उद्यानात जन्मलेला शेवटच्या सिंहाचे निधन झाले. राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकाऱ्यांच्या अनुसार जेस्पा हा खूप दिवसांपासून आजारी होता म्हणून त्याला सार्वजनिक प्रदर्शन पासून दूर ठेवले होते. जी मल्लिकार्जुन, एसजीएनपीचे संचालक आणि वनसंरक्षक म्हणाले, “जेस्पा गंभीर क्रोनिक ऑस्टियोआर्थिटिस ने ग्रस्त होता ज्यामुळे त्याला शरीराच्या मागील बाजूस असलेल्या स्नायूंना त्रास होत होता. ह्या कारणांमुळे त्याला मल्टिपल डेक्यूबिटस अल्सर (बेड सोर्स) आणि सेप्टिक जखमा झाल्याचे समजले. गेल्या १५ दिवसांपासून तो उठू शकत नव्हता आणि आम्ही त्याला निरीक्षणाखाली ठेवले होते”.

हे ही वाचा:

अभिनेते पुनीत इस्सार ह्यांना १३ लाखांनी लुटले

उद्धव ठाकरे नैराश्यातून हे बोलत आहेत…

सोमालियाच्या लष्कराचा बॉम्ब हल्ला, १०० दहशतवाद्यांचा खात्मा

बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील पुलाचा स्लॅब अचानक कोसळला

एसजीएनपीच्या अधिकाऱ्यांची जेस्पाचे शवविच्छेदन केले आणि रितीनुसार त्याचे अंत्यसंस्कार केले. जेस्पाचा जन्म २२ सप्टेंबर २०११ रोजी एसजीएनपीमध्ये झाला होता. रवींद्र आणि शोभा या जोडीला झालेला तो बछडा होता – ज्यांना २००९ मध्ये बन्नेरघट्टा प्राणीसंग्रहालयातून उद्यानात आणण्यात आले होते. ह्याच दरम्यान, केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने (सीझेडए) मंजूर केलेल्या प्राणी विनिमय कार्यक्रमांतर्गत, दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय उद्यानाला गुजरातमधील जुनागढ येथील सक्करबाग प्राणी उद्यानातून सिंहांची नवीन जोडी मिळाली

Exit mobile version