शिवडी बीडीडी चाळ रहिवासी वाट पाहात आहेत!

शिवडी बीडीडी चाळ रहिवासी वाट पाहात आहेत!

मुंबईतील बीडीडी चाळीतील सर्वच इमारती जीर्ण झालेल्या असून त्या वाईट अवस्थेत आहेत. मुंबईतील वरळी, ना. म. जोशी मार्ग, नायगाव येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. कामालाही सुरुवात झाली आहे त्यामुळे आता शिवडीच्या बीडीडी चाळीतील रहिवाशांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. तीन चाळींच्या नावांसोबत शिवडीच्या चाळीचे नाव नसल्यामुळे रहिवाशांच्या मनात संभ्रम व नाराजी निर्माण झाली आहे.

शिवडी बीडीडी चाळीतील रहिवासी गेल्या वीस- पंचवीस वर्षांपासून पुनर्वसनाचा प्रश्न घेऊन अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी व मंत्री यांना भेटून निवेदने, चर्चा करून पाठपुरावा करत आहेत. २०१८ पर्यंत इतर प्रकल्पासोबत शिवडीच्या बीडीडी चाळींचा उल्लेख केला जात होता. शिवडीच्या इमारती या बीपीटीच्या जागेवर भाडेतत्त्वावर असल्यामुळे हा प्रकल्प मागे राहिला आहे, असे शिवडी बीडीडी चाळ पुनर्विकास समितीचे मानसिंग राणे यांनी सांगितले.

हे ही वाचा:

आधी आरोग्य मंदिरं उघडतील, मंदिरे नंतरच!

राज्याने केले हात वर; महापालिकांना करावा लागणार तिसऱ्या लाटेत खर्च

‘आधी चोऱ्या करायच्या आणि नंतर बहाणे करायचे’ दरेकरांचा मलिकांवर पलटवार

मुंबई महानगरपालिकेचे ५१ कोटीचे दोन पदपथ

शिवडी बीडीडी चाळींची जमीन पाच एकर असून त्यावर १२ इमारती आहेत. परंतु ही जमीन मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीची असल्यामुळे तेथील कामासाठी केंद्र सरकारची परवानगी असणे आवश्यक आहे. यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे म्हाडाने बीपीटीला सादर केली आहेत. बीपीटीने केंद्राकडे त्याबद्दल प्रस्ताव पाठवला आहे. त्यावर अजूनही कार्यवाही झालेली नसल्याचे सांगण्यात येते. म्हाडा, एसआरए, महापालिका आणि बीपीटी या उच्च अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली असून शिवडी बीडीडी प्रकल्पाला बीपीटीचा आक्षेप नसून ते केंद्र सरकारच्या आदेशाची वाट पाहत आहेत.

इमारती जीर्ण झाल्या आहेत. भिंतीना तडे गेले आहेत, बऱ्याच ठिकाणी स्लॅब पडत आहेत. केंद्र सरकारकडून हस्तांतराला परवानगी मिळेपर्यंत प्रकल्प मार्गी लागणार नाही.

Exit mobile version