राजधानीत भीषण पाणीबाणी…लोकांनी घेतला टँकरचा ताबा

वाढत्या पाणी समस्येवर केजरीवाल सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव

राजधानीत भीषण पाणीबाणी…लोकांनी घेतला टँकरचा ताबा

नुकतेच केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले असली तरी इतरत्र अद्याप उष्णतेची लाट ओसरलेली नाही. उत्तर आणि मध्य भारतातील अनेक राज्यांमध्ये जबरदस्त उकाडा अजूनही नागरिकांना सहन करावा लागत आहे. दरम्यान देशाच्या राजधानीच्या शहरात उष्णतेसोबतच पाण्याचीही मोठी समस्या निर्माण झाली आहे. दिल्लीतील अनेक भागात भीषण पाणीटंचाई असून लोकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. यासंबंधीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दिल्लीतील अनेक भागांमध्ये लोकांना पाणी मिळत नसून लोक बादल्या घेऊन पाण्याच्या टँकरच्या मागे धावत आहेत. पाण्याचा टँकर पाहताच लोकांची मोठी झुंबड उडत असल्याचे असे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. शिवाय या उकाड्यात लोक लांब रांगेत पाण्यासाठी उभे आहेत. पाणी संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन दिल्ली सरकारने गुरुवारी तातडीची बैठक बोलावली होती.

दिल्लीत उष्णता सातत्याने वाढत असून विक्रम मोडत आहे. पारा ५० अंशांच्या पुढे पोहोचला आहे, त्यामुळे दिल्लीतही पाण्याची मागणी सातत्याने वाढत आहे. राजधानीतील अनेक भागात पाणीटंचाई असल्याच्या बातम्या येत आहेत, त्यामुळे दिल्ली सरकारनेही पाण्याचा अपव्यय केल्यास दंड आकारण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. पाण्याची मागणी वाढल्यानंतर दिल्ली सरकारनेही कठोर पावले उचलली आहेत. विनाकारण पाण्याचा अपव्यय करणाऱ्या अशा लोकांवर कारवाई करण्यात येईल, असे दिल्ली सरकारने स्पष्ट केले आहे. यामध्ये अशा लोकांचाही समावेश आहे जे बाईक किंवा कार धुण्यासाठी घरगुती पाण्याचा वापर करतात. यासाठी दिल्ली सरकारने सुमारे २०० पथके तयार केली आहेत, जी दिल्लीतील विविध भागात छापे टाकत आहेत.

हे ही वाचा:

लंडनमध्ये ठाकरेंना घाम फुटणार, निवडणूक आयोग करणार कारवाई

लोकसभा निवडणुकीदरम्यान ११०० कोटी रुपयांची रोकड, दागिने जप्त

एअर इंडियाच्या विमानात आठ तास एसीशिवाय; प्रवासी बेशुद्ध झाले

ब्रिटनमधून सोन्याची घरवापसी; ब्रिटनकडून रिझर्व्ह बँकेने १०० टनांहून अधिक सोनं आणलं

वाढत्या पाणी समस्येवर केजरीवाल सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव

दिल्लीतील वाढत्या पाणी समस्येवर केजरीवाल सरकारने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राज्यातील पाण्याची समस्या भेडसावत असून हरियाणा, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या राज्यांकडून एक महिनाभर अतिरिक्त पाणी देण्यात यावे, अशा मागणीची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. “कडाक्याच्या उन्हात दिल्लीची पाण्याची गरज वाढली आहे, देशाच्या राजधानीच्या गरजा पूर्ण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे अशा मागण्या या याचिकेतून करण्यात आल्या आहेत.

Exit mobile version