पोलिसभरती पेपरफुटी प्रकरणी सात जणांना अटक!

हवाई दलाच्या माजी अधिकाऱ्याही अटक

पोलिसभरती पेपरफुटी प्रकरणी सात जणांना अटक!

एसटीएफने उत्तर प्रदेश पोलिस भरती परीक्षेतील पेपरफुटीप्रकरणी सहा जणांना मेरठमधून अटक केली आहे. तर, या प्रकरणी नोएडातूनही हवाई दलाच्या माजी अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

मेरठमधून दीपक, बिट्टू, प्रवीण, रोहित, नवीन आणि साहिल यांना अटक करण्यात आली आहे. दीपक आणि साहिल हे दोघे या परीक्षेला बसले होते. हरयाणातील एका तरुणाने त्यांना या प्रश्नपत्रिका दिल्या होत्या, असे चौकशीत आढळून आले आहे. या प्रश्नपत्रिका त्यांनी आठ ते १० लाख रुपयांना परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना विकल्या.

हे ही वाचा :

जपानकडून सहा बुलेट ट्रेन खरेदी करणार!

रोहतकची जागा अभिनेता रणदीप हुड्डाला?

डीआरआयची कारवाई; मुंबईतून २४ किलो सोनं जप्त

सीरियामध्ये दहशतवाद्यांचा गावकऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार; १८ जणांचा मृत्यू

१८ फेब्रुवारीला होणाऱ्या परीक्षेची प्रश्नपत्रिका या उमेदवारांच्या व्हॉट्सअपवर १७ फेब्रुवारीलाच आली होती. ज्यांच्याकडे पहिल्यांदा प्रश्नपत्रिका आली, त्यांची नावे प्रवेश, गुलजार, आसिफ आणि गौरव अशी आहेत. हे चौघेही फरार आहेत. तर, एसटीएफच्या नोएडा युनिटने या प्रकरणी बुधवारी हवाईदलाचा निलंबित कर्मचारी प्रमोद पाठक याला दिल्लीच्या मुखर्जी नगरमधून अटक केली. तो नोएडा सेक्टर ३७मध्ये राहात होता. स्पर्धा परीक्षेतील पेपरफुटीप्रकरणाशी संबंधित टोळीशी संबंध असल्याकारणाने त्याला हवाई दलाच्या सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

ही प्रश्नपत्रिका हरयाणामधूनच फुटली असल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. ज्या आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे, त्यांच्या चौकशीतून हरयाणाचेच नाव पुढे आले आहे. त्यामुळे आता एसटीएफच्या पथकाने हरयाणात मुक्काम ठोकला आहे.आरोपींकडून आठ मोबाइल फोन, १८ फेब्रुवारीला होणाऱ्या परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तरपत्रिकाही जप्त करण्यात आली आहे.

Exit mobile version