गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये लागलेल्या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू

४० जण जखमी तर ३० हून अधिक जणांना वाचविण्यात यश

गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये लागलेल्या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू

मुंबईतील गोरेगावमधील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, साधारण ४० जण जखमी झाले आहेत. तर सुमारे ३० जणांना सुखरुप वाचविण्यात यश आले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं असून, सध्या कुलिंगचे काम सुरू आहे.

गोरेगाव पश्चिमेकडील उन्नत नगरमधील एसआरएच्या जय भवानी इमारतीला मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. ग्राउंड प्लस पाच मजल्याची ही इमारत आहे. ही आग लेवल दोन प्रकारची असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाने दिली आहे. आग लागण्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग नियंत्रणात आणली.

या आगीत अडकलेल्या ३० पेक्षा अधिक नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. तर, ४० जण या आगीमध्ये जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सात महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे. सात जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. मृतांमध्ये तीन मुले, तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या आगीत तळमजल्यावरील काही दुकाने आणि समोर पार्क असलेल्या गाड्या जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत पार्किंगमधील ३० दुचाकी आणि चार कार जळून खाक झाल्या आहेत.

हे ही वाचा:

औषधांच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे मृत्यू नाहीत!

काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशला भारतापासून वेगळे दाखवण्यासाठी रेटला अजेंडा

मैदानासमोर कचरा टाकल्याने नागरिकांना मनस्ताप

लेझर लाईटनंतर डीजेच्या आवाजामुळे पोलिसांना कानाचा त्रास

एसआरए इमारतीत पार्किंगच्या मागे चिंध्यांचे स्टोअरेज होते. त्यात आग लागली. हा धूर इमारतीच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत गेला. त्यामुळे अनेकांना गुदमरल्यासारखे झाले. त्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, असं अग्निशमन दलाच्या जवानांनी माहिती दिली.

Exit mobile version