मुंबईतील चेंबूर येथे रविवारी एका दुमजली दुकानासह इमारतीला लागलेल्या आगीत तीन मुलांसह एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. सिद्धार्थ कॉलनी येथील इमारतीत पहाटे ५.२० च्या सुमारास हा प्रकार घडला.
याबाबत अग्निशमन विभागाच्या अधिका-यांनी सांगितले की, इमारतीचा तळमजला दुकान म्हणून आणि वरचा मजला निवासस्थान म्हणून वापरला जात होता. तळमजल्यावरील विजेच्या ताराजवळ शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचे कारण समोर आले आहे. अधिका-यांनी याला ‘लेव्हल वन’ आग म्हणून संबोधले आहे. कारण नुकसान दुकानातील इलेक्ट्रिक वायरिंग आणि इंस्टॉलेशन्सपर्यंत मर्यादित होते.
हेही वाचा..
हिमालयात अडकलेल्या युके, युएसच्या महिलांची सुटका
जम्मू-काश्मीर: निकालापूर्वी दहशतवाद्यांचा कट हाणून पाडला, शस्त्रे-स्फोटके जप्त!
इस्रायलचा गाझामधील मशिदीवर हवाई हल्ला, १८ ठार!
स्त्री शक्तीचा जागर: स्वराज्याच्या पहिल्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई!
पोलीस उपायुक्त हेमराज सिंग राजपूत यांनी सांगितले की, अधिकारी अपघाताच्या कारणाचा तपास करतील. आम्हाला सकाळी ६ च्या सुमारास जी प्लस २ इमारतीबद्दल कॉल आला, तळमजल्यावर एक दुकान होते आणि इतर दोन मजल्यावर कुटुंबे होती. यामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला आहे. दुकानात झोपलेले दोघे तेथून पळून गेले आहेत, असे एएनआय या वृत्तसंस्थेने अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले.
आगीत गंभीर भाजलेल्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा अखेर मृत्यू झाला. प्रेसी प्रेम गुप्ता (७), मंजू प्रेम गुप्ता (३०), अनिता धरमदेव गुप्ता (३९), प्रेम चेदिराम गुप्ता (३०) आणि नरेंद्र गुप्ता (१०), विधी चेदिराम गुप्ता (१५) आणि गीता देवी धरमदेव गुप्ता अशी त्यांची नावे आहेत.