‘फेंगल’चा तडाखा; ४० टन वजनाचा दगड कोसळून सात जणांचा मृत्यू

‘फेंगल’चा तडाखा; ४० टन वजनाचा दगड कोसळून सात जणांचा मृत्यू

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘फेंगल’ चक्रीवादळ तामिळनाडू आणि पुद्दुचेरीजवळ धडकले. ‘फेंगल’ चक्रीवादळाने तामिळनाडूतील अनेक जिल्ह्यांमध्ये हाहाःकार माजवला आहे. अशातच पावसामुळे तिरुवन्नमलाई येथील घरांवर दगड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. सुमारे ४० टन वजनाचा मोठा दगड कोसळल्याने पाच मुलांसह सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनास्थळी बचावकार्य सुरु असून चार मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

तिरुवन्नमलाई जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो आणि मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सामान्य मदत निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश दिले आहेत, असे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी म्हटले आहे.

तामिळनाडूतील तिरुवन्नमलाई येथे एका टेकडीवरून भूस्खलन झाले. माती, दगडांचे ढिगारे खाली कोसळले. यासोबतच सुमारे ४० टन वजनाचा एक दगड डोंगरावरून खाली आला आणि पायथ्याशी असलेल्या व्हीयूसी नगर परिसरातील घरांवर पडला. त्यामुळे दोन घरे भुईसपाट झाली. ढिगाऱ्याखाली सात जण अडकल्याची माहिती आहे. सध्या ढिगारे हटवले जात असून हायड्रोलिक लिफ्टने दगड हटवण्याचा प्रयत्नही एनडीआरएफकडून सुरू आहे.

हे ही वाचा:

एकनाथ शिंदेंशी कोणतेही मतमतांतर नाही…आमचा शपथविधी दिमाखदार होईल

अजित पवार महायुतीत नसते तर?

मेट्रिमोनियल वेबसाईटवर राहुल नाव सांगून मोहम्मद हुसैनने तरुणीवर केले लैंगिक अत्याचार

पंतप्रधान मोदींच्या आमंत्रणावरून २०२५ मध्ये पुतीन करणार भारत दौरा!

मुख्यमंत्री स्टॅलिन म्हणाले की, चक्रीवादळ फेंगलने तामिळनाडूच्या १४ जिल्ह्यांमध्ये जबरदस्त विनाश केला आहे. १.५ कोटी लोकांना प्रभावित केले आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF) मधून २००० कोटी रुपये तात्काळ पुनर्वसन कार्यासाठी जारी करण्याचे आवाहन केले त्यांनी आहे. चक्रीवादळाच्या नंतरच्या परिणामांमुळे तमिळनाडूच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली असून दक्षिण भारतातील अनेक भागांमध्येही मंगळवारी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.

Exit mobile version